ChatGPT आणि DeepSeek सारखी AI टूल्स वापरू नका; केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:25 IST2025-02-05T10:20:01+5:302025-02-05T10:25:49+5:30
भारतात मोठ्या प्रमाणात AI चा वापर वाढलेला आहे. लोक त्यांचे काम सहजपणे आणि झटपट करण्यासाठी याचा वापर करतात.

ChatGPT आणि DeepSeek सारखी AI टूल्स वापरू नका; केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिले आदेश
नवी दिल्ली - भारत सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे. अनेक सरकारी कर्मचारी त्यांच्या ऑफिसच्या कॅम्प्युटर आणि लॅपटॉपवर AI App जसं ChatGPT, DeepSeek चा वापर करतात. त्यामुळे भारत सरकारचे कॉन्फिडेशियल डॉक्यूमेंट आणि डेटा धोक्यात येऊ शकतो असं अर्थ मंत्रालयाने काढलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे AI टूल्स वापरू नका अशी सूचना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटलंय की, AI टूल्स सरकारी कॅम्प्यूटर, लॅपटॉप किंवा अन्य डिवाईसमध्ये वापर करणे टाळायला हवे. डेटा आणि प्रायव्हेसीला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी त्यांच्या वैयक्तिक डिवाईसमध्ये AI चा वापर करू शकतात असं सांगितले गेले आहे. भारतात बरेच परदेशी AI APP उपलब्ध आहेत. ज्यात ChatGPT, DeepSeek आणि Google Gemini चा समावेश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात AI चा वापर वाढलेला आहे. लोक त्यांचे काम सहजपणे आणि झटपट करण्यासाठी याचा वापर करतात.
AI APP अथवा टूल्स डिवाईसमध्ये इन्स्टॉल करताना ते आवश्यक परवानगी मागते, त्यातून सरकारी फाईली आणि महत्त्वाचा डेटा लीक होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. AP Apps आणि AI ChatBot च्या मदतीने अनेक लोक प्रोम्प्ट देऊन लेटर, आर्टिकल अथवा ट्रान्सलेशन करतात. बरेच जण त्याचा वापर प्रेझेंटेशन देण्यासाठीही करतात. याठिकाणी यूजर्सला फक्त एक सिंपल प्रोम्प्ट द्यावे लागते.
दरम्यान, चीन आणि अमेरिका या दोन देशाची एआय क्षेत्रात मक्तेदारी सुरू झाली आहे. यामुळे आता भारतही एआय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. भारत स्वतःच्या मोठ्या भाषेच्या मॉडेलवर म्हणजेच एलएलएमवर काम करत आहे आणि ते १० महिन्यांत तयार होईल. सरकारने १८००० GPUs असलेली संगणकीय सुविधा तयार केली आहे. ते लवकरच स्टार्टअप्स, संशोधक आणि विकासकांसाठी उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनीकुमारने दिली आहे.