सरदारजींवर जोक्स करायचे की नाही?

By admin | Published: October 30, 2015 10:02 PM2015-10-30T22:02:35+5:302015-10-30T22:02:35+5:30

लोकांना हसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विनोदांमध्ये शीख समुदायाला लक्ष्य बनविण्यात येत असल्याचा आरोप करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी शुक्रवारी दाखल करून घेतली.

Do not want to joke on Sardarji? | सरदारजींवर जोक्स करायचे की नाही?

सरदारजींवर जोक्स करायचे की नाही?

Next

नवी दिल्ली : लोकांना हसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विनोदांमध्ये शीख समुदायाला लक्ष्य बनविण्यात येत असल्याचा आरोप करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी शुक्रवारी दाखल करून घेतली.
महिला वकील हरविंदर चौधरी यांनी ही जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, शीख समुदाय हा आपल्या निखळ विनोदबुद्धीसाठी ओळखला जातो आणि ते सुद्धा या विनोदाचा आनंद लुटत असतात. आपण खुशवंतसिंग यांचे विनोद ऐकले असतील. हा केवळ एक मनोरंजनाचा भाग असून आपण त्यावर बंदी का आणू इच्छिता? बहुतांश विनोदांमध्ये शीख समुदायाच्या लोकांना मूर्ख अथवा कमी बुद्धी असल्याचे दर्शविण्यात येत असून हा प्रकार अनुचित आहे, अशी भावना याचिकाकर्त्याने व्यक्त केली असून असे विनोद प्रकाशित करणाऱ्या ५००० वर वेबसाईटस्वर निर्बंध अथवा वेबफिल्टर लावण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. सरदारांवरील विनोदांमुळे आमच्या मुलांना अपमान आणि लाज वाटते, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.
पंतप्रधानांनी बिहारी लोक बुद्धिमान असतात असे म्हटले होते. यावरून इतर समुदाय बुद्धिमान नाही, असे संकेत मिळतात, असे याचिकाकर्त्या म्हणाल्या. यावर चिंता करू नका आम्ही पंजाबला जाऊ तेव्हा तेथे शीख बुद्धिमान असतात असे सांगू,अशी टिप्पणी पीठाने केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Do not want to joke on Sardarji?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.