पद्मावत एक 'मनहूस' चित्रपट, वेळ आणि पैसा वाया घालवू नका - असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 01:59 PM2018-01-19T13:59:38+5:302018-01-19T16:21:25+5:30

पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी विविध संघटना आणि नेत्यांकडून या चित्रपटाला असणारा विरोध कायम आहे.

Do not waste your money & time to watch Padmaavt - Asaduddin Owaisi | पद्मावत एक 'मनहूस' चित्रपट, वेळ आणि पैसा वाया घालवू नका - असदुद्दीन ओवेसी

पद्मावत एक 'मनहूस' चित्रपट, वेळ आणि पैसा वाया घालवू नका - असदुद्दीन ओवेसी

googlenewsNext
ठळक मुद्देपद्मावत एक बकवास, मनहूस चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट पाहण्यात वेळ घालवू नका असे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केले आहे. राजपूत राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यातील संघर्षावर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे.

नवी दिल्ली - पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी विविध संघटना आणि नेत्यांकडून या चित्रपटाला असणारा विरोध कायम आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी अद्यापी दूर झालेल्या नाहीत. आता एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पद्मावत चित्रपटाच्या विरोधात मतप्रदर्शन केले आहे. 

पद्मावत एक बकवास, मनहूस चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट पाहण्यात वेळ घालवू नका असे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केले आहे. राजपूत राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यातील संघर्षावर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. बुधवारी रात्री वारंगल शहरात जाहीरसभेला संबोधित करताना ओवेसी यांनी हे विधान केले. खासकरुन त्यांनी मुस्लिम तरुणाईला पद्मावत चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले. हा चित्रपट पाहून तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका असे ते म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालायाचा निकाल
कालच सुप्रीम कोर्टानं पद्मावत सिनेमाच्या बाजूनं निर्णय दिल्यानं सिनेनिर्मात्यांना दिलासा मिळाला.  चार राज्यांमध्ये पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर लावण्यात आलेल्या बंदीला कोर्टानं स्थगिती दिली. पद्मावत सिनेमा प्रदर्शित करण्यास विविध राज्यांतील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तब्बल चार राज्यांनी पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. 25 जानेवारीला पद्मावत सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.  

दरम्यान, या चार राज्यांकडून पद्मावत सिनेमावर लावण्यात आलेली बंदी घटनाबाह्य असल्याचंही कोर्टानं सांगितले. वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी निर्मात्यांची बाजू कोर्टासमोर मांडली. साळवे यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्डकडून संपूर्ण देशाला सिनेमा प्रदर्शित करण्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. अशात काही राज्यांनी सिनेमावर लावलेली बंदी ही घटनाबाह्य आहे. ही बंदी हटवण्यात यावी, अशी विनंती करत साळवेंनी निर्मात्यांची बाजू कोर्टासमोर मांडली.

Web Title: Do not waste your money & time to watch Padmaavt - Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.