आश्वासनांचे तुकडे फेकून निवडणुका जिंकत नाही !

By admin | Published: August 31, 2016 04:20 AM2016-08-31T04:20:40+5:302016-08-31T04:20:40+5:30

आश्वासने लटकत ठेवून व काही तुकडे फेकून निवडणुका जिंकता येतील परंतु देश चालवता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले

Do not win elections and win elections! | आश्वासनांचे तुकडे फेकून निवडणुका जिंकत नाही !

आश्वासनांचे तुकडे फेकून निवडणुका जिंकत नाही !

Next

सनोसरा (गुजरात) : आश्वासने लटकत ठेवून व काही तुकडे फेकून निवडणुका जिंकता येतील परंतु देश चालवता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. त्यांच्या हस्ते मंगळवारी सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन (सौनी) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद््घाटन झाले.
पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांची ही येथील पहिलीच भेट होती. मोदी यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. गुजरातमध्ये निवडणुका होणार असल्यामुळे मोदी यांच्या या भेटीवर काँग्रेसने टीका केली होती.
सौनी प्रकल्प हा गुजरात सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून दुष्काळाला दर तीन वर्षांनी तोंड देत असलेल्या सौराष्ट्रातील ११५ धरणे सरदार सरोवर धरणातील अतिरिक्त पाण्याने भरण्याची योजना आहे. त्यासाठी कालवे आणि पाईपलाईनचा वापर केला जाईल. ५७ किलोमीटरची पाईपलाईन करून झाल्यानंतर या पहिल्या टप्प्याचे उद्््घाटन झाले.


मोदी यांच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण दूरदर्शनचा कॅमेरामन संतोष शेजकर धरणाच्या पाण्यात उभा राहून करीत होता. मोदी यांच्या उपस्थितीत त्या वेळी धरणातून पाणी सोडण्यात आले.
त्यामुळे पाण्याचा प्रवाह इतका वाढला की ते पाहणाऱ्या मोदी यांना धोका जाणवला. त्यांनी लगेच मुख्यमंत्री विजय रूपानी यांना सांगून कॅमेरामनला तिथून दूर जाण्यास भाग पाडले.
कॅमेरामन नदीतून बोहर येताच, पाण्याचा प्रचंड लोंढा त्याच्या कॅमेऱ्यावर आदळला आणि कॅमेरा दिसेनासा झाला. पण मोदी यांच्या समयसूचकतेमुळे संतोष शेजकर याचा मात्र जीव वाचला.

भाषणादरम्यान घोषणाबाजी
मोदी यांचे भाषण सुरू असताना पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या (पास) सदस्यांना त्यांनी घोषणा दिल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय जवळपासच्या भागातून ‘पास’च्या सुमारे २५ जणांनाही ताब्यात घेण्यात आले. सौनी पाटबंधारे प्रकल्पाचे उद््घाटन झाल्यानंतर मोदी भाषण करीत असताना पटेल संघटनेशी संबंधित तीन युवकांनी ‘जय सरदार, जय पाटीदार’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना तेथून दूर नेले.

Web Title: Do not win elections and win elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.