चिंता नको, शनिवार, रविवारीही बँका सुरू राहणार!

By Admin | Published: November 9, 2016 06:45 PM2016-11-09T18:45:02+5:302016-11-09T19:10:19+5:30

तुम्हाला नोटा बदलून घ्यायच्या असतील किंवा पैसे काढायचे असतील तर चिंता करण्याचे कारण नाही.

Do not worry, banks will continue on Saturday, Sunday too! | चिंता नको, शनिवार, रविवारीही बँका सुरू राहणार!

चिंता नको, शनिवार, रविवारीही बँका सुरू राहणार!

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 9 -  500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर देशभरातील नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पण तुम्हाला नोटा बदलून घ्यायच्या असतील किंवा पैसे काढायचे असतील तर चिंता करण्याचे कारण नाही. नोटा बदलून घेण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी  पुढच्या काही दिवसांमध्ये बँकात होणारी गर्दी विचारात घेऊन येत्या शनिवार आणि रविवारीही  बँका सुरू ठेवण्याचे  आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. 
नरेंद्र मोदी यांनी देशात निर्माण होणाऱ्या काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता.  मात्र व्यवहारातील नोटा अचानक चलनातून बाद झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच आज बँका आणि एटीएम बंद असल्याने चलन तुटवडा निर्माण झाला. तसेच 500 आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने दैनंदिन  व्यवहारही ठप्प झाले होते.  त्यामुळे गुरुवारी बँका सुरू झाल्यावर बॅंकांमध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोईसाठी बँकांमध्ये एक तास अधिक काम होणार आहे. तसेच येत्या शनिवारी आणि रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला असून, तशी सूचना बॅंकांना केली आहे. 
 

Web Title: Do not worry, banks will continue on Saturday, Sunday too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.