चीनचं काहीतरी करा... अभिनेत्री रिचा चड्डाची थेट गृहमंत्री अमित शहांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 08:01 PM2020-06-01T20:01:45+5:302020-06-01T20:02:37+5:30
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष कार्यक्रमात अमित शहा यांनी विविध मुद्यांवर चर्ची केली
मुंबई - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. देशात या व्हायरसचा धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 1 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे चीनमधून आलेल्या कोरोनाचं संकट असताना, दुसरीकडे सीमारेषेवर चीनी सैन्याचं संकट आहे. त्यामुळे, चीनला धडा शिकविण्याची मागणी सोशल मीडियातून सरकारकडे होत आहे. आता, अभिनेत्री रिचा चड्डानेही केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चीनचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष कार्यक्रमात अमित शहा यांनी विविध मुद्यांवर चर्ची केली. कोरोनासह महाराष्ट्रातील परिस्थितीवरही शहा यांनी भाष्य केलं. मोदी सरकारच्या दोन वर्षातील कार्याचा आढावा देत एनआरसी, सीएए, आर्टीकल ३७० या मुद्द्यांनाही शहा यांनी हात घातला. सध्या, चीनसोबत लडाख सीमारेषेवर सुरु असलेल्या वादावरुन शहा यांना विचारण्यात येत आहेत.
चीनसोबत लडाख सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लवकरच या समस्येचा तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. लष्करी व मुत्सद्दी पातळीवर दोन्ही देशांमधील वाटाघाटी सुरूच आहेत. आज देशाकडे सक्षम नेतृत्व आहे. देशाची मान झुकू देणार नाही. देशातील जनतेला यावरही विश्वास आहे, असेही संरक्षणमंत्र्यानी म्हटले आहे. मात्र, गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप चीनसोबतच्या वादावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. त्यामुळे अभिनेत्री रिचा चड्डा हिने थेट आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अमित शहा यांचा फोटो शेअर करत, चीनचं काहीतरी करा... अशी मागणी केली आहे.
चीन का कुछ करें https://t.co/mVa6VF8zxD
— TheRichaChadha (@RichaChadha) June 1, 2020
आम्ही कुणाचं काही घेऊ इच्छित नाही, पण आमचं कोणी काही घेण्याचा प्रयत्न केल्यास चांगलच उत्तर दिलं जाईल, असे अमित शहांनी म्हटलं होतं. अमित शहांच्या या विधानाला ट्विटरवरुन शेअर करत, रिचा चड्डा यांनी चीनचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली आहे.