Online Medicines:तुम्हीही ऑनलाईन औषधे खरेदी करता का? लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 08:18 PM2022-04-30T20:18:42+5:302022-04-30T20:19:25+5:30

Online Medicines: गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन औषधे खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. मात्र अशी ऑनलाईन औषध खरेदी करत असताना अनेकदा लोक अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना योग्य औषधाऐवजी चुकीची औषधे मिळतात.

Do you also buy medicines online? Remember these things, otherwise big damage can happen | Online Medicines:तुम्हीही ऑनलाईन औषधे खरेदी करता का? लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान 

Online Medicines:तुम्हीही ऑनलाईन औषधे खरेदी करता का? लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान 

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन औषधे खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. मात्र अशी ऑनलाईन औषध खरेदी करत असताना अनेकदा लोक अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना योग्य औषधाऐवजी चुकीची औषधे मिळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन औषधे खरेदी करताना कुठल्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, याची माहिती पुढीलप्रमाणे.

सर्वप्रथम ऑनलाईन औषध खरेदी करताना तुम्ही विश्वसनीय वेबसाईटची निवड करा. जर तुम्ही असे केले तर तुम्ही नकली औषधांची खरेदी करण्यापासून वाचू शकाल. म्हणजेच नकली औषधांपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे हा उत्तम पर्याय आहे.

त्याशिवाय ऑनलाईन औषध ऑर्डर करण्यापूर्वी कस्टमर केअरशी बोलून घ्या. त्यादरम्यान, तुम्ही ऑनलाइन औषधे खरेदी करण्याची माहिती मिळवा. त्याशिवाय जेव्हा तुम्ही ऑनलाईन औषधे मागवता तेव्हा ती तुमच्या फॅमिली डॉक्टर्सना दाखवून तपासून घ्या. तुम्हाला योग्य औषध मिळाले आहे की, नाही, याची माहिती करून घ्या.

तसेच डिलिव्हरी बॉयकडून औषध घेताना बिल अवश्य घ्या. त्यामुळे तुम्ही मागवलेल्या औषधांची माहिती मिळेल. म्हणजेच  तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कंपनीविरोधात तक्रारही दाखल करू शकाल.  

Web Title: Do you also buy medicines online? Remember these things, otherwise big damage can happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.