तुम्हीही घरात रोकड ठेवता? असा आहे नियम, त्यापेक्षा अधिक कॅश सापडल्यास भरावा लागू शकतो १३७ टक्के कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 17:26 IST2022-12-03T17:25:39+5:302022-12-03T17:26:33+5:30
Cash Rupees: ऑनलाईन पेमेंटचे कितीही पर्याय उपलब्ध झाले असले तरी अजूनही दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रक्कम बाळगण्यास प्राधान्य दिले जाते. दरम्यान घरात रोख रक्कम ठेवण्याबाबत काही नियम आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडतो.

तुम्हीही घरात रोकड ठेवता? असा आहे नियम, त्यापेक्षा अधिक कॅश सापडल्यास भरावा लागू शकतो १३७ टक्के कर
नवी दिल्ली - ऑनलाईन पेमेंटचे कितीही पर्याय उपलब्ध झाले असले तरी अजूनही दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रक्कम बाळगण्यास प्राधान्य दिले जाते. दरम्यान घरात रोख रक्कम ठेवण्याबाबत काही नियम आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र माहितीसाठी सांगायचं तर घरात किती रोख रक्कम ठेवायची याबाबत काहीही मर्यादा नाही आहे. तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे घरात ठेवू शकता. मात्र कितीही रोकड बाळगली तरी तुमच्यावर कुणी कारवाई करणार नाही असं नाही. प्राप्तिकर विभाग तुमच्या घरावर छापा टाकू शकतो. तुम्ही घरात कितीही रोख रक्कम ठेवली तरी ते पैसे कुठूण आणले याचा सोर्स तुमच्याकडे उपलब्ध असला पाहिजे. याचा अर्थ जेवढी रक्कम तुमच्या घरामध्ये आहे, कुठूण आणली याचं समाधानकारक उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे.
तसेच ती रक्कम कराच्या चौकटीत येत असेल तर तुम्ही त्यावरील कर भरला आहे का, यासारख्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. जर तुमच्याजवळ उत्पन्नाच्या स्रोताचे पुरावे असतील आणि तुम्ही त्या रकमेवरील कर भरलेला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे.
मात्र जर प्राप्तिकर विभागाचं तुमच्या उत्तरानं समाधान झालं नाही आणि तुमच्याकडून सांगितल्या गेलेल्या सोर्ससंबंधित कागदपत्रांमध्ये गडबड दिसून आली. तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं हे दिसून आलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दंड भरावं लागेल. तसेच तुमच्या घरामध्ये सापडलेल्या एकूण रकमेच्या १३७ टक्के दंड भरावं लागेल.