Tatkal ticket Booking: रेल्वेच्या तत्काळ तिकिट बुकिंगची ही पद्धत माहितीय का? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 08:47 AM2021-01-24T08:47:07+5:302021-01-24T08:54:22+5:30
Train Tatkal ticket Booking : तत्काळ तिकिट बुक करण्यासाठी रेल्वेने एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता एसी क्लास आणि नॉन एसी स्लीपरसाठी ११ वाजताची वेळ दिली आहे. आधी ही वेळ एकच होती.
नवी दिल्ली : अचानक काहीतरी प्रसंग आला किंवा काम निघाले आणि आयआरसीटीसीवर जाऊन रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटले की तिकडे कायमच हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले असतात. म्हणजेच वेटिंगचे. अशावेळी रेल्वेचे तत्काळ तिकीट बुक करावे लागते. सीझनमध्ये तर सर्रास तत्काळचाच आधार घ्यावा लागतो. 1997 पासून ही स्कीम सुरु आहे. तत्काळमध्ये स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी किंवा एक्झिक्युटीव्ह क्लासची तिकिटे काढता येतात. परंतू हे तत्काळ तिकीट पेटीएमद्वारेही काढता येते.
तत्काळ तिकिट बुक करण्यासाठी रेल्वेने एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता एसी क्लास आणि नॉन एसी स्लीपरसाठी ११ वाजताची वेळ दिली आहे. आधी ही वेळ एकच होती. हे तिकिट तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा IRCTC च्या वेबाईटवर बुक करू शकता. तत्काळसाठी एका पीएनआरवर केवळ चार प्रवाशांचे तिकिट बुक करता येते. तिकिटांच्या काळ्याबाजारामुळे हे करावे लागले आहे. तरीही सॉफ्टवेअरचा वापर करून तिकिटांचा काळाबाजार केला जातो. असे अनेक प्रकार पकडण्यात आले आहेत.
हे लक्षात ठेवा...
तत्काळ तिकिट ट्रेनचा चार्ट तयार होईपर्यंत बुक करता येते. अनेकदा चार्ट तयार होईपर्यंत तिकिट वेटिंगवर दिसते आणि चार्ट तयार झाला की ते कन्फर्म होते. तर अनेकदा तिकिट वेटिंगवरच राहते. हे पैसे माघारी दिले जातात. कन्फर्म तत्काळ तिकिट रद्द केल्यास रेल्वे तुम्हाला कोणतेही पैसे देत नाही. तर वेटिंगचे तिकिट आपोआप रद्द होते आणि काही प्रमाणावर चार्ज आकारून रेल्वे पैसे परत करते.
Paytm द्वारे तात्काळ तिकिट बुक करण्याची पद्धत...
- पेटीएम अकाऊंट लॉगिन करा. तत्काळ तिकिटची रेल्वेची वेळ होऊन गेली की अर्ध्या तासाने पेटीएमद्वारे तत्काळ तिकिट बुक करता येते. एसी क्लास 10.30 आणि नॉन एसी क्लास 11.30 वाजताची वेळ आहे.
- बुक ट्रेन तिकिटवर क्लिक करा...
- आता सोर्स म्हणजेच जिथून निघायचे आहे ते ठिकाण आणि डेस्टिनेशन म्हणजे जिथे पोहोचायचेय ते ठिकाण टाका.
- प्रवासाची तारीख निवडा.
- कोणत्या ट्रेनने प्रवास करायचा ते निवडा.
- Quota मध्ये जाऊन तत्काळ सिलेक्ट करा आणि बुक बटन क्लिक करा.
- प्रवाशांची संख्या भरा.
- तुम्हाला हवा असलेला बर्थ सिलेक्ट करा.
- पेमेंट गेटवेवर पोहोचल्यावर पैसे भरा. लगेचच तुमचे तिकिट बुक होईल.