मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमधील 'या' सुविधा तुम्हाला माहीत आहेत का ?
By महेश चेमटे | Published: March 25, 2018 08:14 PM2018-03-25T20:14:53+5:302018-03-25T20:14:53+5:30
देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे. बुलेट ट्रेनमध्ये सुविधा कशा प्रकारे असणार याची उत्सुकता कोट्यवधी जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली - देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे. बुलेट ट्रेनमध्ये सुविधा कशा प्रकारे असणार याची उत्सुकता कोट्यवधी जनतेमध्ये निर्माण झाली आहे. याच धर्तीवर प्रवाशांचा बुलेट प्रवास नक्की कसा असेल याचा लोकमत प्रतिनिधीने घेतलेला हा आढावा…
मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन
- ३२० किमीप्रतितास या वेगाने धावण्याची क्षमता
- १ बोगीच्या २४ ट्रेन घेणार
- एका बुलेट ट्रेनची ७५० आसन क्षमता
- १० बोगीची एक ट्रेन
- 16 बोगीची ट्रेन 2033 मध्ये
- अल्युमिनियम बॉडी
- आसनाच्या खालील भागात हवेच्या व्हेंटेलेशन साठी अल्युमिनियम हनी कोंब तंत्रज्ञानाची विशेष सुविधा ,
- १० बोगीपैकी ७ बोगीमध्ये शौचालयाची सुविधा
- महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वछतागृह आणि शौचालय
- दिव्यांग प्रवासासाठी १ विशेष शौचालय
- बुलेट ट्रेन मध्ये बिझनेस आणि स्टॅंडर्ड क्लास
- बिझनेस क्लासमध्ये फ्रीजसह अन्य सुविधा
- १० बोगीपैकी एक बोगी बिझनेस क्लाससाठी राखीव
- मराठी सह गुजराती हिंदी आणि इंग्रजी भाषेत lcd प्रवासी उद्घोषणा सुविधा
- आपत्कालीन व्यवस्थेत १० मिनिटात प्रवाशाना सुरक्षित स्थळी पोहचवण्याची सुविधा
- बोगीसह शौचालयात आपत्कालीन इंटरकोम सुविधा
- ऑटोमॅटिक सीट रोटेशन ने दोन बटनांच्या माध्यमाने सीट फिरवणे होणार शक्य