'या' मंदिरांमधील साम्य तुम्हाला माहीत आहे का ?
By admin | Published: July 28, 2016 09:07 PM2016-07-28T21:07:12+5:302016-07-28T21:07:12+5:30
शंकराची ही सर्व मंदिरं भारताच्या एका सरळ रेषेत वसलेली आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - देशातल्या अनेक राज्यांमध्ये हिंदू देव-देवतांची अनेक मंदिरं स्थित आहेत. प्रत्येक मंदिराला विशेष असं महत्त्व आहे. केदारनाथ, कालहस्ती, एकंबरानाथ, थिरुवनामलाई, थिरुवन्नाईकालम, चिदंबरम नटराजा, रामेश्वरम, कालेश्वरम अशी एकाहून एक सुबक आणि स्वयंभू मंदिरं देशात आहेत. या मंदिरांमध्ये काय साम्य आहे, असा प्रश्न विचारल्यावर अर्थातच तुम्ही म्हणाल ही भगवान शंकराची मंदिरं आहेत. पण जरा थांबा ! या मंदिरांचं अजून एक आश्चर्य तुम्हाला माहिती नाही. विशेष म्हणजे भगवान शंकराची ही सर्व मंदिरं भारताच्या एका सरळ रेषेत मध्यावर वसलेली आहेत. या मंदिरांचं विशेषत्व म्हणजे वास्तुविशारदानं ही सर्व मंदिरं कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणा आणि जीपीएस नसताना जमिनीपासून 100 किलोमीटरच्या उंचीवर बांधलेली आहेत. त्या काळात अत्याधुनिक यंत्रणा नसताना एका सरळ रेषेत मध्यावर अत्यंत सुबक आणि शिल्पाकृतीची सांगड घालून ही मंदिरं बांधण्यात आली आहेत. ही मंदिरं कशी बांधली आणि अगदी भारताच्या सरळ रेषेत मध्यावरच ती कशा प्रकारे वसवण्यात आली, याचं कोडं अद्यापही उलगडलं नाही..