पीएनबीची पहिली शाखा कुठे उघडली तुम्हाला माहिती आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 06:16 PM2018-02-16T18:16:39+5:302018-02-16T18:17:17+5:30

11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँक अडचणीत सापडली आहे. देशातील या सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाच्या बँकेला विजय माल्यापासून नीरव मोदीसारख्या उद्योगपतींनी चुना लावला.

Do you know where PNB's first branch opened? | पीएनबीची पहिली शाखा कुठे उघडली तुम्हाला माहिती आहे का ?

पीएनबीची पहिली शाखा कुठे उघडली तुम्हाला माहिती आहे का ?

Next

नवी दिल्ली- 11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँक अडचणीत सापडली आहे. देशातील या सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाच्या बँकेला विजय माल्यापासून नीरव मोदीसारख्या उद्योगपतींनी चुना लावला. परंतु या बँकेचा इतिहास भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारा राहिला आहे. पंजाब नॅशनल बँकेचा इतिहास हा 122 वर्षं जुना आहे. 1900मध्ये या बँकेची पहिली शाखा लाहोरच्या बाहेरील कराची-पेशावर(आताचं पाकिस्तान)मध्ये उघडण्यात आली होती.

या बँकेची सुरुवात करण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी लाला लजपत राय यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. त्यावेळी लाल लजपत राय यांच्याबरोबर स्वातंत्र्याच्या अभियानाशी जोडले गेलेले दयाल सिंह मजिठिया, पंजाबचे पहिलं उद्योगपती लाला हरकिशन लाल, काली प्रसन्न रॉय, पारशी उद्योगपती ईसी जेस्सावाला, मूल्तानचे राजे प्रभू दयाल, जयशी राम बक्षी आणि लाला डोलन दास यांनी बँकेची पायाभरणी केली. बँक पूर्णतः भारतीय चलनावर सुरू झाली होती. त्यावेळी 14 मूळ शेअर्स होल्डर आणि 7 संचालकांनी फारच कमी शेअर्स घेतले. त्यामागे बँक सामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी हा उद्देश होता.

या बँकेत महात्मा गांधींसह लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, जालियन वाला बाग कमिटीचंही बचत खातं होतं. पंजाब नॅशनल बँकेचं राष्ट्रीयीकरण 1969मध्ये इतर बँकांसोबत झालं होतं. ब्रिटन, हाँगकाँग, काबूल, शांघाई आणि दुबईमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. सद्यस्थितीत पंजाब नॅशनल बँकेत जवळपास 10 कोटी खातेधारक आहेत. देशात पंजाब नॅशनल बँकेच्या 6947 शाखा आहेत. तसेच 9753 एवढं एटीएम सेंटर आहेत. सप्टेंबर 2017मध्ये बँकेतील एकूण जमा ठेवी 6.36 लाख कोटी रुपये होती. पीएनबीचा एकूण एपीए हा 57,630 आहे. 

Web Title: Do you know where PNB's first branch opened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.