माहिती आहे का तुम्हाला ? आजचा दिवस वर्षातील सर्वात मोठा

By admin | Published: June 21, 2016 10:04 AM2016-06-21T10:04:09+5:302016-06-21T10:04:09+5:30

पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो

Do you know why? Today is the largest of the year | माहिती आहे का तुम्हाला ? आजचा दिवस वर्षातील सर्वात मोठा

माहिती आहे का तुम्हाला ? आजचा दिवस वर्षातील सर्वात मोठा

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 21 - आजच्या दिवसाचं म्हणजे 21 जूनचं महत्व काय तुम्हाला माहिती आहे का ? आज आपण वर्षांतला सर्वांत मोठा दिवस अनुभवणार आहोत. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. 
 
या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने ११ हजार किमी प्रती तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो.
 
या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामीची लाट आली त्यामुळे फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंदनी कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद अ‍ॅडजेस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद अ‍ॅडजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अ‍ॅन्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप अ‍ॅडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद अ‍ॅडजेस्ट केला जातो. 

Web Title: Do you know why? Today is the largest of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.