सर्वांनी डाळ सोडून चिकन खावे असे मोदींना वाटते का - दिग्विजय सिंह
By Admin | Published: October 14, 2015 11:31 AM2015-10-14T11:31:26+5:302015-10-14T11:31:26+5:30
देशातील काही भागांमध्ये चिकनपेक्षा डाळ महागली असतानाच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी डाळीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१४ - देशातील काही भागांमध्ये चिकनपेक्षा डाळ महागली असतानाच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी डाळीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील जनतेने डाळ सोडून चिकन खावे असे मोदींना वाटते क असा खोचक सवाल दिग्विजय सिंह यांनी ट्विटरव्दारे विचारला आहे.
देशभरातल डाळीचे दर गगनाला भिडले असून काही भागांमध्ये डाळ ही चिकनपेक्षा महाग दरात मिळत आहे. यावरुन दिग्विजय सिंह यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच दादरी व गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचा वाद दुर्दैवी असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले होते. यावर दिग्विजय सिंह म्हणाले, दादरीतील घटना दुर्दैवी असेल तर या घटनेचे अप्रत्यक्षपणे समर्थन करणा-या भाजपा नेत्यांवर मोदी कारवाई करत नाही. गुलाम अलींचा शो आणि कसुरी यांचा पुस्तक प्रकाशनाचा वाद दुर्दैवी होता असे मोदी म्हणतात. मग या कार्यक्रमांना विरोध दर्शवणा-या शिवसेनेसोबत मोदी युती तोडणार का असा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला आहे.