कमिशनवाले सरकार हवे का? , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल; कर्नाटकात भाजपाचा प्रचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:09 AM2018-02-20T03:09:50+5:302018-02-20T03:10:03+5:30
तुम्हाला मिशनवाले सरकार हवे की कमिशनवाले हवे, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकातील जनतेला उद्देशून केला.
म्हैसुरू (कर्नाटक) : तुम्हाला मिशनवाले सरकार हवे की कमिशनवाले हवे, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकातील जनतेला उद्देशून केला. राज्यात सध्याचे सरकार आणखी काही काळ राहिले, तर कर्नाटक बरबाद होईल, अशी टीकाही त्यांनी केली.
म्हैसुरू-बंगळुरू रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण व म्हैसुरू ते उदयपूर या पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेसला हिरवा कंदील हे दोन कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले. रेल्वे राज्यमंत्री पीयूष गोयल तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या याप्रसंगी उपस्थित होते. त्यानंतर प्रचारसभेत मोदी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील सरकार तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्याचेच काम करीत आहे. आम्ही सर्व अर्धवट योजना तर पूर्ण करीत आहोतच, पण आम्ही नव्या घोषणांची अंमलबजावणीही वेगात करीत आहोत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)
मोदी यांचा पंधरा दिवसांतील हा दुसरा कर्नाटक दौरा आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा तसेच भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही आजपासून कर्नाटक दौºयावर आहेत. या वर्षी विधानसभेच्या निवडणुका असून, कर्नाटकातील हे राज्य मिळवण्यासाठी भाजपाने सारी ताकद लावली आहे.