डॉक्टर 10 वर्षाच्या मुलीचा करणार गर्भपात
By admin | Published: May 17, 2017 09:46 AM2017-05-17T09:46:07+5:302017-05-17T09:54:34+5:30
गर्भाला 20 आठवडे झाले नसतील तर गर्भपात करा किंवा 20 आठवडे उलटून गेले असतील तर प्रसूती होईपर्यंत थांबा.
Next
ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. 17 - बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या दहा वर्षीय मुलीचा गर्भपात करण्यात येणार आहे. हरियाणातील पीजीआयएमएस या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गर्भपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पीडित मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनीच बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. सत्र न्यायालयाने गर्भपात करायचा कि, नाही तो निर्णय डॉक्टरांवर सोडला आहे.
प्रसूती कायद्यानुसार गर्भ 20 पेक्षा जास्त आठवडयांचा असेल तर, गर्भपात करता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीत आईच्या जीवाला धोका असेल तर गर्भपात करता येतो. पीडित मुलगी 18 ते 22 आठवडयांची गर्भवती असल्याने मेडिकल बोर्डावरच्या आठ डॉक्टर्सनी हे प्रकरण सत्र न्यायालायकडे पाठवले. कोर्टाने डॉक्टरांना दोन पर्याय दिले होते.
गर्भाला 20 आठवडे झाले नसतील तर गर्भपात करा किंवा 20 आठवडे उलटून गेले असतील तर प्रसूती होईपर्यंत थांबा. मेडिकल बोर्डाने मानवी दृष्टीकोनातून गर्भपाताचा निर्णय घेतला असे पीजीआयएमएस मेडिकल बोर्डाचे अधीक्षक अशोक चौहान यांनी सांगितले. पीडित मुलगी खूप लहान आहे. प्रसूती तिला पेलवणारी नाही. प्रसूतीमुळे तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यातुलनेत गर्भपात कमी धोक्याचा आहे असे डॉक्टरांनी सांगितले.
पीडित मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी अनेकदा बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. वडिलांनी तिला कोणाकडे वाच्यात केली तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. मागच्या आठवडयात जेव्हा तिने पोटात दुखत असल्याची तक्रार केली तेव्हा आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथे केलेल्या चाचण्यांमध्ये ती मुलगी गर्भवती असल्याचे समजले. तिच्याबरोबर काय घडले ते सांगितल्यानंतर पोलिसांनी तिच्या सावत्र वडिलांना अटक केली.