मारहाण करून डॉक्टरची हत्या
By admin | Published: March 26, 2016 01:12 AM2016-03-26T01:12:42+5:302016-03-26T01:12:42+5:30
पश्चिम दिल्लीच्या विकासपुरी भागात रस्त्यावरील भांडणानंतर एका ४० वर्षीय डॉक्टरची १२ लोकांनी लाठ्याकाठ्या आणि बॅटने बेदम मारहाण करून ह त्या केली. २३ मार्चच्या रात्री
नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीच्या विकासपुरी भागात रस्त्यावरील भांडणानंतर एका ४० वर्षीय डॉक्टरची १२ लोकांनी लाठ्याकाठ्या आणि बॅटने बेदम मारहाण करून ह त्या केली. २३ मार्चच्या रात्री ग्रुप हाऊसिंग सोसायटीजवळ घडलेल्या या घटनेने समाजमन शहारून गेले. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीनासह नऊ जणांना अटक केली आहे.
पश्चिम जिल्हा पोलीस उपायुक्त पुष्पेंद्रकुमार यांनी शुक्रवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, सोसायटीत राहणारे दातांचे डॉक्टर पंकज नारंग यांच्या मुलाने बुधवारी रात्री भारत-बांगलादेश सामना आटोपल्यावर वडिलांकडे क्रिकेट खेळण्याचा हट्ट धरला होता. पंकज त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आणि भाच्यासह घरासमोरील हिरवळीवर क्रिकेट खेळत होते. या दरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या मोटारसायकलस्वारांना बॉल लागला. त्यानंतर हे तरुण आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली. थोड्या वेळाने या बाईकस्वारांनी आपल्या काही साथीदारांसह डॉक्टर पंकज यांच्या घरावर हल्लाबोल केला. पंकज यांना घराबाहेर खेचून काढत लाठ्याकाठ्या आणि बॅटने त्यांना बेदम मारहाण केली. पंकज यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या त्यांच्या जावयालाही मारण्यात आले. या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टर पंकज यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीही डॉक्टर आहेत.घटनेनंतर आरोपी फरार झाले. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी डेरेदाखल झाले. आजूबाजूचे लोक आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने नऊ हल्लेखोरांना शोधण्यात आले. (वृत्तसंस्था)