तीन घरांचा ईएमआय भरू न शकल्याने डॉक्टरची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 06:08 AM2021-01-10T06:08:21+5:302021-01-10T06:08:41+5:30

डॉ. विनोद विश्वकर्मा (वय ४४) असे डॉक्टरांचे नाव आहे

Doctor commits suicide by failing to pay EMI of three houses | तीन घरांचा ईएमआय भरू न शकल्याने डॉक्टरची आत्महत्या

तीन घरांचा ईएमआय भरू न शकल्याने डॉक्टरची आत्महत्या

Next

 जबलपूर : तीन घरांचा ईएमआय भरू न शकल्याने एका डॉक्टरनेआत्महत्या केल्याची घटना मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये घडली. डॉ. विनोद विश्वकर्मा (वय ४४) असे डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. विनोद यांनी दुपारी घरातच बाथरुममध्ये दार लावून घेतले आणि ब्लेडने आपला गळा कापला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी डॉ. ममता विश्वकर्मा घरी पोहोचली तेव्हा बाथरुमचा दरवाजा आतून बंद दिसला. खिडकीतून पाहिले असता पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी सांगितले की, या डॉक्टरांनी तीन घरे खरेदी केली होती. 

Web Title: Doctor commits suicide by failing to pay EMI of three houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.