छत्तीसगडमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर गजाआड

By admin | Published: November 13, 2014 11:35 AM2014-11-13T11:35:50+5:302014-11-13T11:36:31+5:30

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील महिलांवर नसबंदीची जीवघेणी शस्त्रक्रिया करणारे डॉ. आर. के गुप्ता यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे.

Doctor GajaAud, a vasectomy surgeon in Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर गजाआड

छत्तीसगडमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर गजाआड

Next
>ऑनलाइन लोकमत
बिलासपूर, दि. १२ - छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील महिलांवर नसबंदीची जीवघेणी शस्त्रक्रिया करणारे डॉ. आर. के गुप्ता यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच आर.के. गुप्ता यांचा वैद्यकिय कारकिर्दीत ५० हजार यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल जानेवारीमध्ये राज्यातील आरोग्यमंत्र्यानी सत्कार केल्याचे उघड झाले आहे. 
बिलासपूर जिल्ह्यातील सकरी (पेन्डारी) गावातील नेमीचंद जैन कॅन्सर रिसर्च सेंटर या खासगी रुग्णालयात गत शनिवारी शासकीय कुटुंब कल्याण आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.  या शिबिरात तखतपूर ब्लॉक आणि बिलासपूरच्या आजूबाजूच्या खेडय़ातील ८३ महिलांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातील १४ महिलांचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला असून सुमारे ४० महिलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी रुग्णालयातील डॉ. आर. के. गुप्ता व त्यांच्या सहका-यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. 
बुधवारी रात्री उशीरा छत्तीसगड पोलिसांनी डॉ. आर. के. गुप्ता यांना अटक केली आहे. गुप्ता यांचा जानेवारीमध्ये छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनी ५० हजार शस्त्रक्रिया केल्याबद्दल सत्कार केल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच गुप्ता यांनी शस्त्रक्रियेदरम्यान वापरलेले साहित्य गंजलेले होते असा दावाही एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. गुप्ता यांनी अवघ्या तीन तासांमध्ये ८३ महिलांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याची माहितीही सूत्रांनी दिली. 

Web Title: Doctor GajaAud, a vasectomy surgeon in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.