डॉक्टर चांगला, पण पेशंट हट्टी, चिदंबरम यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:33 AM2018-02-05T01:33:31+5:302018-02-05T01:33:56+5:30
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्या रूपाने उत्तम ‘डॉक्टर’ मिळालेला असूनही नरेंद्र मोदी सरकार त्यांचा सल्ला न ऐकता स्वत:च आजारपणाचे निदान करून उपचारही करते, अशी मार्मिक टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी केली.
नवी दिल्ली : मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्या रूपाने उत्तम ‘डॉक्टर’ मिळालेला असूनही नरेंद्र मोदी सरकार त्यांचा सल्ला न ऐकता स्वत:च आजारपणाचे निदान करून उपचारही करते, अशी मार्मिक टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी केली.
डॉक्टर चांगला, पण रुग्ण भयंकर अशी सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती आहे, असे सांगून ते म्हणाले की, मुख्य आर्थिक सल्लागार हा वेळ पडेल तेव्हा उपलब्ध होणा-या निवासी डॉक्टरसारखा असतो. त्याने रुग्णाची प्रकृती रोज तपासावी व काही आजारपण आल्यास त्याने लगेच औषधोपचार सुचवावेत, अशी अपेक्षा आहे. सुब्रमणियन यांच्या रूपाने सन २०१४ पासून एक उत्तम डॉक्टर मिळाला आहे. पण रुग्ण मात्र त्याचे न ऐकता स्वत:च निदान करून उपचार करणारा आहे.