गोरखपूरच्या रुग्णालयातील डॉक्टरना झाली अटक, सिलिंडर चोरल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:44 IST2017-09-03T00:43:45+5:302017-09-03T00:44:02+5:30
गोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय (बीआरडी) व रुग्णालयात आॅगस्टमध्ये झालेल्या बालमृत्यमुळे डॉ. काफिला खान यांना पोलिसांनी अटक केली आहे.

गोरखपूरच्या रुग्णालयातील डॉक्टरना झाली अटक, सिलिंडर चोरल्याचा आरोप
लखनऊ, : गोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय (बीआरडी) व रुग्णालयात आॅगस्टमध्ये झालेल्या बालमृत्यमुळे डॉ. काफिला खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये आॅगस्टच्या दुसºया आठवड्यात सहा दिवसांमध्ये ६३ बालकांचा मृत्यू झाला होता. आॅक्सिजनचा पुरवठा थांबल्याने १0 व ११ आॅगस्ट रोजी ३३ मुलांना जीव गमवावा लागला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील आॅक्सिजन सिलिंडर्स आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालकाांनी २३ आॅगस्ट रोजी ७ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्य सचिवांकडे तपासाची सूत्ते होती. त्या तपासाच्या आधारे वैद्यकीय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिवांना हटवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी प्राचार्य मिश्रा व त्यांच्या पत्नीला अटक केली. डॉ काफिल खान यांच्या सिलिंडर चोरीच्या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर आहे. (वृत्तसंस्था)
मुलांना वेळेत आणत नाहीत रुग्णालयात
गंभीर आजारी मुले व नवजात शिशू यांना अतिदक्षता कक्षात उपचारासाठी ठेवले जाते. यात मुदतीआधी जन्मलेली, कमी वजनाची तसेच कावीळ व अन्य संसर्गजन्य आजार असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी सांगितले.