२५ वर्षीय युवा क्रिकेटरला रुग्णालयातच आला हार्टअटॅक; ९० मिनिटांत ४० वेळा श्वास थांबला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 09:44 AM2022-03-05T09:44:35+5:302022-03-05T09:45:10+5:30

बैतुलच्या आमला येथे राहणाऱ्या २५ वर्षीय युवा क्रिकेटरच्या छातीत वेदना होऊ लागल्यानं रुग्णालयात आणलं होतं.

Doctor save the 25-year-old younger cricketer life from the mouth of dying Heart Attack | २५ वर्षीय युवा क्रिकेटरला रुग्णालयातच आला हार्टअटॅक; ९० मिनिटांत ४० वेळा श्वास थांबला, पण...

२५ वर्षीय युवा क्रिकेटरला रुग्णालयातच आला हार्टअटॅक; ९० मिनिटांत ४० वेळा श्वास थांबला, पण...

Next

बैतुल – मध्य प्रदेशातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याठिकाणी २५ वर्षीय युवकाला रुग्णालयात उपचारासाठी आणलं होतं. त्याठिकाणी बसल्या जागेवरच त्याला हार्ट अटॅक आला आणि तो जमिनीवर कोसळला. दीड तासांच्या अवधीत तब्बल ४० वेळा त्याचा श्वास थांबला परंतु डॉक्टरांनी देवदूत बनून त्याचा जीव वाचवला. ही घटना २१ फेब्रुवारीची असल्याचं सांगितले जात आहे. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बैतुलच्या आमला येथे राहणाऱ्या २५ वर्षीय युवा क्रिकेटरच्या छातीत वेदना होऊ लागल्या. रात्री ११ च्या सुमारास वेदना असहय्य झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात भरती केले. युवक रिसेप्शनजवळ बसला होता. रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. डॉक्टरही तिथे उपस्थित होते. त्याचवेळी बसल्या जागेवरच युवक जमिनीवर कोसळला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला कार्डियक मसाज देण्यास सुरूवात केली. युवकाची रिसेप्शन ते आयसीयूपर्यंत पोहचण्याच्या दीड तासांच्या अवधीत ४० वेळा श्वास थांबत थांबत सुरू होता.

डॉक्टर बनले देवदूत

डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर युवकाचा जीव वाचला त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी त्याला नागपूरला आणलं. ज्याठिकाणी युवकाच्या हार्टमध्ये ८० टक्के ब्लॉकेज असल्याचं समजलं. युवकाची एंजियोग्राफी करण्यात आली. जर वेळीच उपचार झाले नसते तर या युवकाचा जीव जाण्याची दाट शक्यता होती. युवकाची प्रकृती आता सुधारल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

युवकाच्या हार्टमध्ये ८० टक्के ब्लॉकेज

हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर श्याम सोनी म्हणाले की, २१ फेब्रुवारीला उपचारासाठी एक युवक आला होता. तो राज्यस्तरीय क्रिकेटर आहे. रिसेप्शनवर बसला असताना त्याला अटॅक आला आणि जमिनीवर पडला. दीड तासांत युवकाचा ४० हून अधिक वेळा श्वास थांबला. त्याला कार्डियक मसाज एक इंजेक्शन दिले. त्यानंतर इलेक्ट्रीक शॉक दिला गेला ज्यामुळे युवकाचा जीव वाचला असं त्यांनी सांगितले. युवकाला पुढील उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी युवकाच्या हार्टमध्ये ८० टक्के ब्लॉकेज असल्याचं समोर आलं. त्यावर यशस्वीरित्या ऑपरेशन करून त्याला बरं करण्यात आलं आहे.

Read in English

Web Title: Doctor save the 25-year-old younger cricketer life from the mouth of dying Heart Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.