उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 08:16 AM2024-10-03T08:16:10+5:302024-10-03T08:19:06+5:30
दिल्लीत हॉस्पिटलमध्ये घुसून एका डॉक्टरची त्याच्यात कॅबिनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Delhi Crime : दिल्लीतील जैतपूर परिसरातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये घुसून दोघांनी डॉक्टरची हत्या केली. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी थेट हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरला गोळ्या घातल्या. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी डॉक्टरची निर्घृणपणे हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
कालिंदी कुंज पीएस परिसराती जैतपूर येथील निमा हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जावेद नावाच्या डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन पुरुष जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना भेटण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. डॉक्टरच्या हत्येनंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला.
जखमी झाल्याचा बहाणा करत दोन हल्लेखोरांनी हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरला त्याच्याच केबिनमध्ये मारले. दोन्ही आरोपींनी डॉक्टरवर गोळी का मारली आणि त्यांच्यात काय वैर होते, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस हॉस्पिटलचे आणि डॉक्टरच्या केबिनचे सीसीटीव्ही तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Delhi | A doctor shot dead inside Nima Hospital, Jaitpur under Kalindi Kunj PS area. CCTV footage visuals being examined to identify the accused. As per hospital staff, two men had come to the hospital with an injury, after dressing they had demanded to meet the doctor and shot…
— ANI (@ANI) October 3, 2024
जखमी असल्याचे सांगत दोन तरुण हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांच्यावर उपचाक करुन जखमेवर ड्रेसिंग करण्यात आली. यानंतर त्यांनी डॉक्टरांना भेटायचे असल्याचे सांगितले. दोघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचताच त्यांनी डॉक्टर जावेदवर गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे जावेद यांना नेमकं काय झालं कळलं नाही. गोळ्या लागल्याने जावेद यांचा जागीच मृत्यू झाला.