डॉक्टरांना औषधांची नावे ठळक लिहिण्याचा आदेश द्यावा, हायकोर्टात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:06 AM2019-04-01T08:06:47+5:302019-04-01T08:07:21+5:30
प्रत्येक डॉक्टरने औषधाचे नाव त्याच्या जेनेरिकसह स्पष्ट अक्षरांत प्राधान्याने कॅपिटल लेटर्समध्ये लिहून इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन्स, २००२ चे नियमन १.५ चे कठोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
नवी दिल्ली : डॉक्टरांनी औषधे लिहून देताना अतिशय स्पष्ट अक्षरांत प्रामुख्याने ठळक अक्षरांत (कॅपिटल लेटर्स) द्यावीत, असा आदेश केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय परिषदेला (एमसीआय) द्यावा, अशी मागणी करणारी सार्वजनिक हिताची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
प्रत्येक डॉक्टरने औषधाचे नाव त्याच्या जेनेरिकसह स्पष्ट अक्षरांत प्राधान्याने कॅपिटल लेटर्समध्ये लिहून इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन्स, २००२ चे नियमन १.५ चे कठोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. व्यवसायाने वकील असलेले अमित साहनी यांनी दाखल
केलेल्या या याचिकेत युक्तिवाद केला की, २०१७ मध्ये एमसीआयने सगळ्या नोंदणीकृत डॉक्टरांना
त्यांनी औधषांची नावे जेनेरिक लिहावीत, असे आदेश दिले होते; परंतु डॉक्टरांनी हा आदेश गांभीर्याने घेतलेला नाही.