चेन्नईत डॉक्टरवर चाकूहल्ला, रुग्णालयात केले सपासप वार, चार जण अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 02:49 PM2024-11-13T14:49:59+5:302024-11-13T14:50:09+5:30

Tamil Nadu News: तामिळनाडूमधील चेन्नई येथील कलैग्नार सेंटेनरी रुग्णालयात सेवा देत असलेल्या एका डॉक्टरवर रुग्णाच्या एका नातेवाईकाने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Doctor stabbed in Chennai, stabbed in hospital, four people updated | चेन्नईत डॉक्टरवर चाकूहल्ला, रुग्णालयात केले सपासप वार, चार जण अपडेट

चेन्नईत डॉक्टरवर चाकूहल्ला, रुग्णालयात केले सपासप वार, चार जण अपडेट

तामिळनाडूमधील चेन्नई येथील कलैग्नार सेंटेनरी रुग्णालयात सेवा देत असलेल्या एका डॉक्टरवर रुग्णाच्या एका नातेवाईकाने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील कॅन्सर वॉर्डमध्ये काम करत असलेले डॉक्टर बालाजी यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. ज्या व्यक्तीने डॉक्टरवर हल्ला केला त्याची आई रुग्णालयात उपचार घेत आहे.  

या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, या प्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. येथे चार उत्तर भारतीय उपचारांसाठी आले आहेत. त्यांनी डॉक्टरांना एका खोलीत कोंडले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी पोलीस तत्काल कारवाई करतील. तसेच यामध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांनाही अटक करतील. 

मात्र हल्लेखोराबाबत तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेला दावा पुढे खोटा निघाला. तसेच आरोपी हा दक्षिण भारतातीलच असल्याचं समोर आलं आहे. आरोपीचं नाव विघ्नेश आहे. तसेच तो पल्लावरम येथे राहणारा आहे. तसेच तो उत्तर भारतातील नाही तर दक्षिण भारतामधील असल्याचं समोर आलं आहे. 

आरोपीने डॉक्टरवर सातवेळा चाकूहल्ला केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने चाकूहल्ला केल्याचं कबूल केलं आहे. या घटनेनंतर डॉक्टरांमध्ये संतापाचं वातावरण आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस संपूर्ण प्रकरणाच तपास करत आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चेन्नईमध्ये सरकारी डॉक्टरवर झालेली हल्ल्याची घटना धक्कादायक असल्याचे सांगितले. तसेच या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तीला त्वरित अटक करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर बालाजी यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Web Title: Doctor stabbed in Chennai, stabbed in hospital, four people updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.