डासांबद्दल तक्रार करणाऱ्या डॉक्टरला विमानातून उतरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:40 AM2018-04-11T04:40:49+5:302018-04-11T04:40:49+5:30

डासांच्या उपद्रवाबद्दल तक्रार करणा-या एका डॉक्टरला इंडिगो विमानातूनच उतरवण्यात आले. हा प्रकार लखनऊ विमानतळावर घडला असून या डॉक्टरचे नाव सौरभ राय असे आहे.

The doctor who complained about the mosquitoes was taken off the plane | डासांबद्दल तक्रार करणाऱ्या डॉक्टरला विमानातून उतरवले

डासांबद्दल तक्रार करणाऱ्या डॉक्टरला विमानातून उतरवले

Next

लखनऊ : डासांच्या उपद्रवाबद्दल तक्रार करणा-या एका डॉक्टरला इंडिगो विमानातूनच उतरवण्यात आले. हा प्रकार लखनऊ विमानतळावर घडला असून या डॉक्टरचे नाव सौरभ राय असे आहे. तो बंगळुरूचा रहिवासी असून हृदयरोगतज्ज्ञ आहे.
डॉ. राय हे सोमवारी सकाळी सहा वाजता इंडिगोच्या विमानात चढले. त्यांनी विमानात डास असल्याची तक्रार कर्मचाºयांकडे केली. काहीतरी उपाययोजना करा, अशीही विनंती केली. मात्र विमान कर्मचाºयांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व जागेवर शांतपणे बसून राहा असे बजावले. त्यामुळे संतप्त डॉ. रायने विमान कर्मचाºयांना जाब विचारला. त्यांच्यात वादावादी सुरू झाली. इतर प्रवासीही अस्वस्थ झाले. शेवटी सुरक्षेचे कारण पुढे करत या डॉक्टरला विमानातून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर ते धावपट्टीपासून विमानतळातील टर्मिनलपर्यंत चालत गेले.
>इंडिगो कंपनीच्या कर्मचाºयांनी काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथे एका प्रवाशाला मारहाण केली होती.
दहशतवादी असल्याचा आरोप
डॉ. राय यांनी या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकला आहे. आपल्याला विमान कर्मचाºयांनी मारहाण केल्याचा व दहशतवादी म्हटल्याचा आरोपही त्यांनी केला.
कंपनी म्हणते, त्यांनीच धमकीची भाषा वापरली
इंडिगो कंपनीने म्हटले की, कर्मचाºयांनी काही करण्याआधीच डॉ. राय यांनी धमकीवजा भाषेत बोलणे सुरू केले. विमानाचे नुकसान करावे यासाठी ते इतर प्रवाशांनाही चिथावणी देऊ लागले. संभाषणात अपहरण या शब्दाचाही वापर केला. अखेर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना विमानातून उतरवावे लागले. दरम्यान सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: The doctor who complained about the mosquitoes was taken off the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.