बलात्कार पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरांचाही उडाला थरकाप; मध्य प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:14 PM2018-06-29T22:14:44+5:302018-06-29T22:15:00+5:30

सातत्याने होत असलेल्या बलात्काच्या घटनांमुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच मध्य प्रदेशमधील मंदासौर येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे.

Doctors also shouted at the rape victim's condition; Nirbhaya case repeats in Madhya Pradesh | बलात्कार पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरांचाही उडाला थरकाप; मध्य प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती 

बलात्कार पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरांचाही उडाला थरकाप; मध्य प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती 

Next

मंदासौर - सातत्याने होत असलेल्या बलात्काच्या घटनांमुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच मध्य प्रदेशमधील मंदासौर येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. येथे एका सात वर्षांच्या मुलीवर नराधमाने निर्भायाप्रमाणेच क्रूर बलात्कार केल्याचे समोर आले असून, पीडितेसी अवस्था पाहून डॉक्टरांचाही थरकाप उडाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून, आरोपींना फाशी देण्याची मागणी होत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्याला पाच दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.  

मध्य प्रदेशमधील मंदासौर येथे मंगळवारी 7 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला मारहाण करून जखमी केले. तसेच तिच्या गुप्तागांवरही जखमा केल्या. अखेरीस तिचा गळा कापून हत्या करण्याचा प्रयत्न केला.   

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या  वृत्तानुसार,  पीडित मुलीवर करण्यात आलेले अत्याचार पाहून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही थरकाप ऊडाला. रुग्णालयात दाखल करण्यात आलेली पीडिता सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, या घटनेविरोधात मुस्लिम समाजाने मोर्चा काढला. तसेच आरोपीला बहिष्कृत करून त्याला फाशी देण्याची मागणी केली.  

Web Title: Doctors also shouted at the rape victim's condition; Nirbhaya case repeats in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.