Doctors Day : सात महिन्यांच्या गर्भवती, तरीही दररोज 60 किमीचा प्रवास करून बजावतायेत कोरोनाग्रस्तांची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:50 PM2020-07-01T15:50:41+5:302020-07-01T15:51:46+5:30
पृथ्वीवर देवाचे रूप. म्हणजेच, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी.
फाजिल्का : कोरोना ड्युटी करत असलेल्या डॉक्टर सुनीता कंबोज या लोकांनी घरीच थांबण्याचा आणि मास्क घालण्याचा सल्ला देतात. तसेच, सात महिन्यांच्या गर्भवती असूनही कोरोना रुग्णांच्या काळजीसाठी जलालाबाद ते फाजिल्का सिव्हिल हॉस्पिटल असा दररोज 60 किलोमीटर लांबीचा प्रवास करतात.
डॉ. सुनीता कंबोज यांना घरी परत यायला रात्रीचे 12 सुद्धा वाजत होते, पण त्यांच्यासाठी कर्तव्य सर्वात महत्त्वाचे होते. दरम्यान, त्यांच्या या सर्वोत्तम आरोग्य सेवासाठी त्यांना येत्या 15 ऑगस्ट रोजी पोलीस डीजीपी पुरस्कार देण्यात येणार आहे.
डॉ. सुनीता यांनी सांगितले की, "कोरोना कालावधीत सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, कोरोना रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास पाहून त्यांना क्वारंटाईन करणे, नमुने घेणे, फील्ड वर्क, राज्य समन्वय साधणे आहे. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णाची चांगली काळजी घेण्यात सक्षम झाल्याने मला देखील आनंद होतो."
पृथ्वीवर देवाचे रूप. म्हणजेच, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी. तीन महिन्यांपासून ते कोरोनाविरूद्ध युद्ध करीत आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, त्यांच्या वर्दीचा रंग निळा आणि पांढरा आहे. न थांबता सतत कर्तव्य बजावणे. घरगुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सकारात्मक आणि निरोगी ठेवण्याचे काम करत आहेत. एकच ध्येय म्हणजे या साथीच्या रोगाचा पराभव करणे.
सर्वप्रथम रूग्ण त्यानंतर कुटुंब, असे लुधियानाचे डॉ. अनमोल रत्न आणि त्यांची पत्नी डॉ. मीनल गुप्ता यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच सिव्हिल हॉस्पिटलचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. अनमोल रत्न आयसोलेशन वॉर्डमध्ये तैनात आहेत. ते दररोज कोरोना रुग्णांचे नमुने घेतात. 4 वर्षांच्या मुलाला भेटू शकत नाही. लोकांचे सहकार्य आपल्याला पुढे काम करण्याचे धैर्य देते आणि कुंटुब पाठिंबा देते, असे डॉ. अनमोल रत्न सांगतात.
याचबरोबर, डॉ. अनमोल रत्न यांची पत्नी डॉ. मीनल गुप्ता या डीएमसीमध्ये माइक्रोबायोलॉजिस्ट आहेत. कोरोना रुग्णांचे नमुने तपासण्यात मोठे योगदान देत आहेत. दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी (दि.30) 5 लाख 66 हजार 840 झाली आहे. तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत असून, आता ते राज्य दिल्लीपेक्षा पुढे गेले आहे.
महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आता तामिळनाडूमध्ये आहेत. देशात 24 तासांमध्ये 418 रुग्ण मरण पावले असून, कोरोनाच्या बळींची संख्या त्यामुळे 16 हजार 893 वर गेली आहे.