डॉक्टरांचे देशव्यापी २ तास कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:20 AM2018-03-31T05:20:32+5:302018-03-31T05:20:32+5:30
केंद्रीय कॅबिनेटने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून आयुवेर्दीक ब्रिजकोर्स वगळला, एमबीबीएस परिक्षेत आणखी एका फोटोचा सामावेश केला.
मुंबई : केंद्रीय कॅबिनेटने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून आयुवेर्दीक ब्रिजकोर्स वगळला, एमबीबीएस परिक्षेत आणखी एका फोटोचा सामावेश केला. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयावर देशभरातील डॉक्टर समाधानी नाहीत. डॉक्टरांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत सरकारविरोधात संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २ एप्रिलला डॉक्टर आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या दिवशी देशव्यापी दोन तास कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाबाबत २ एप्रिलला डॉक्टर केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डांसोबत चर्चा करणार आहेत. या दोन तासांच्या कामबंद आंदोलनामुळे दिवसभर करण्यात येणारा संप मात्र रद्द करण्यात आला आहे. विधेयकाच्या नवीन मसुद्याचा अभ्यास केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले. दोन एप्रिलला राज्याच्या सर्व मेडिकल काऊं सिलचे अध्यक्ष आणि सचिव यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यात यंग मेडिकोस अॅक्शन काऊंसिलचे पदाधिकारीही उपस्थित असतील.