'डॉक्टरांनी महिन्यात फक्त 1 ऑपरेशन मोफत करावं, देशाचं चित्रच बदलेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:15 PM2020-08-18T14:15:45+5:302020-08-18T14:16:11+5:30
सोनून आत्तापर्यंत हजारो प्रवाशांना त्यांच्या स्वगृही पोहचवले असून कित्येकांना नोकरीही देण्याचं काम केलंय. लॉकडाऊन काळात सोनूने केलेल्या कामामुळे तो रॉबीनहूड बनला आहे.
मुंबई - अभिनेता सोनू सूदने गेल्या काही महिन्यांपासून हजारो प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन काळात मुंबईतून परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं काम अजूनही सुरूच आहे. त्यातच, आता प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे. प्रवासी मजूरांच्या मदतीपासून सुरू झालेलं त्याचं काम दिवसेंदिवस वाढतच आहे. सोनूकडून गरीब आणि गरजू रुग्णांच्या वैद्यकीय सर्जरीसाठीही मदत करण्यात येत आहे. सोनूने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अशाच रुग्णांच्या मदतीची स्टोरी दाखविण्यात आली आहे.
सोनून आत्तापर्यंत हजारो प्रवाशांना त्यांच्या स्वगृही पोहचवले असून कित्येकांना नोकरीही देण्याचं काम केलंय. लॉकडाऊन काळात सोनूने केलेल्या कामामुळे तो रॉबीनहूड बनला आहे. नेटीझन्सनेही सोनूच्या कामाचं मोठं कौतुक करत त्याला व्हिलन रोल करणाऱ्या हिरोचा खिताब दिलाय. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी एबीपी न्यूजवर सोनू सूदने लॉकडाऊन काळातील मदतीच्या घटनांची माहिती दिली. देशातील वैद्यकीय सेवांबद्दल बोलताना सोनूने आपलं मत व्यक्त केलं.
Proud of you nizam. The day all the doctors pledge to adopt a patient, this country will have a new look❤️ #adoptapatienthttps://t.co/pMraE8Mea4
— sonu sood (@SonuSood) August 17, 2020
या कार्यक्रमात मोहम्मद निझाम या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याची स्टोरी सांगण्यात आली. त्यावेळी, देशातील डॉक्टरांनी महिन्यातून केवळ 1 ऑपरेशन मोफत करण्याची शपथ घेतली, तर देशाचं चित्र बदलले, असे सोनू सूदने म्हटलं. मी, आपण किंवा इतर कुणीही नागरिकांनी ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी, एक रुग्ण दत्तक घेतला, एका रुग्णाच्या मेडिसीनचा खर्च केला, सर्जरी मोफत केली तर अनेक समस्या दूर होतील, असे सोनूने म्हटले. मोहम्मद निझाम या विद्यार्थ्याने मेडिकलची परीक्षा दिली असून तो डॉक्टर बनला आहे.
Proud of you nizam. The day all the doctors pledge to adopt a patient, this country will have a new look❤️ #adoptapatienthttps://t.co/pMraE8Mea4
— sonu sood (@SonuSood) August 17, 2020
सोनू सूदच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोहम्मदने दररोज एका रुग्णाला मोफत उपचार देण्याची शपथ घेतली आहे. माझे पदवी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर सेवेत रुजू होताच, मी हा उपक्रम हाती घेईल, असे मोहम्मदने म्हटले आहे. सोनू सूदने मोहम्मदचे हे ट्विट रिट्वीट करत प्रत्येक डॉक्टराने अशी शपथ घेतल्यास देशाचं चित्र बदलेल असं म्हटलंयं.