उत्तर प्रदेशात गोमूत्र 'हेल्थ ड्रिंक' म्हणून विकण्याची तयारी, औषधंही तयार करण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 12:18 PM2018-02-06T12:18:44+5:302018-02-06T12:19:28+5:30
उत्तर प्रदेशात गोमूत्र हेल्थ ड्रिंक म्हणून विकण्याची तयारी सुरू केली आहे.
पाटणा- उत्तर प्रदेशात गोमूत्र हेल्थ ड्रिंक म्हणून विकण्याची तयारी सुरू केली आहे. पीलीभीतच्या सरकायी आयुर्वेदिक फार्मसीने गोमूत्र एकत्र करून ते बाटलीत पॅक करून विकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या ही फार्मसी आयुर्वेदिक औषधं तयार करून त्यांना पश्चिम उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यात पुरवठा करते. पीलीभीतच्या सरकारी आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मुख्याध्यापक व अधीक्षक
डॉक्टर प्रकाश चंद्र सक्सेना यांनी सांगितलं की, फक्त औषध म्हणून नाही तर गोमुत्र हेल्थ ड्रिक म्हणून विकण्याची तयारी केली जाते आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार केला असून लखनऊच्या आयुर्वेद विभागाशी यासंबंधी चर्चा केली जाणार आहे. दररोज 10 के 20 एमएल गोमूत्र प्यायल्याने अनेक आजारांपासून स्वतःला वाचविला येईल. सर्दी, ताप आणि पोटदुखी सारख्या आजारांचं निवारण होतं. दररोज गोमूत्र प्यायल्याने रोग प्रतिकार शक्तीही वाढते. सोप्या पद्धतीने गोमूत्र लोकांपर्यंक पोहचविणं हा आमचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
एनजीओ आणि सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या गोशाळांशी संपर्क करण्याचा आमचा विचार आहे. यासाठी लवकरच आयुर्वेद विभागाशी चर्चा केली जाणार आहे. गोमूत्र हेल्थ ड्रिंक म्हणून विक्यासाबरोबरच फार्मसीने या महिन्यापासून औषधं बनविण्यासाठी गोमूत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला असल्याचंही सक्सेना यांनी म्हंटलं.
फार्मसीचे इनचार्ज डॉक्टर नरेश चंद्र गंगवार यांनी सांगितलं, या महिन्यापासून औषधं तयार करण्यासाठी गोमूत्राचा वापर केला जाईल, असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. गोमूत्र आयुर्वेदिक औषधाचा एक भाग आहे. गोमूत्र आरोग्यासाठी फायद्याचं असल्याचं रिसर्चमधूनही स्पष्ट झालं आहे. ताप व सर्दीबरोबरच गोमूत्राचा वापर कॅन्सर आणि त्वचेच्या आजारावरील उपचारासाठी करण्याचा विचार आहे. आयुर्वेदीिक औषधं कधीही हानिकारक नसतं त्यामुळे त्यांची मागणी वाढते आहे, असंही ते म्हणाले.