CoronaVirus: गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:31 PM2021-05-11T12:31:02+5:302021-05-11T12:32:14+5:30
CoronaVirus: आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोमय उपयुक्त असून, यामुळे कोरोनाला दूर ठेवले जाऊ शकते, असा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात डॉक्टरांनी एक इशारा दिला आहे.
नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. कोरोनामुक्तीसाठी अनेक उपाय केले जात आहेत. अशातच आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोमय उपयुक्त असून, यामुळे कोरोनाला दूर ठेवले जाऊ शकते, असा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात डॉक्टरांनी एक इशारा दिला आहे. (doctors warn against use of cow dung as cure for coronavirus)
देशातील बहुतांश डॉक्टरांनी कोरोनावर उपचार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गायीच्या शेणाचा वापर करण्यासंदर्भात इशारा दिला आहे. गोमय कोरोनावर प्रभावी असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा वा प्रमाण नाही. याउलट, यामुळे अन्य रोगांना आमंत्रण मिळण्याचा अधिक धोका असतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात गोशाळेचे रुपांतर कोव्हिड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. तसेच येथील रुग्णांवर गाईचे दूध आणि गोमूत्रापासून तयार करण्यात आलेल्या औषधांच्या मदतीने उपचार केले जात आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोना बरा होण्यासाठी मदत मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं”
डॉक्टरही गोबर थेरपीसाठी येतात
एका औषध कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोबर थेरपी घेण्यासाठी अनेक डॉक्टरही येत असतात. या थेरपीमुळे रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होऊन भयमुक्तपणे रुग्णांवर उपचार करण्यासाठी जाऊ शकतो, असा या डॉक्टरांना विश्वास वाटतो, असे ते म्हणाले. हिंदू धर्मात गायीला पृथ्वी आणि जीवनाचे पवित्र प्रतीक मानले जाते. प्राचीन काळापासून शेणाने कच्ची घरे सारवली गेल्याचे पाहायला मिळते. गायीचे शेण आणि गोमुत्र यांमध्ये अनेक औषधीय गुणधर्म असल्याचे सांगितले जाते.
“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”
गोबर थेरपी काय आहे?
हिंदू भिक्षुंच्या माध्यमातून श्री स्वामीनारायण गुरुकूल विश्वविद्या प्रतिष्ठान चालवले जाते. येथे अनेक जण गोबर थेरपी घेण्यासाठी येत असतात. आश्रमात येणाऱ्यांच्या शरीरावर गोमय आणि गोमुत्र यांचे तयार केलेले मिश्रण लावले जाते. तसेच ऊर्जा वाढवण्यासाठी योगाभ्यासही केला जातो. यानंतर हे मिश्रण दूध किंवा ताकाने धुतले जाते, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, अशा प्रकारच्या उपचारांवर देशभरातील अनेक डॉक्टरांनी आक्षेप घेतला असून, गंभीर इशाराही दिला आहे.
“सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका
वैज्ञानिक पुरावा नाही
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी सांगितले की, याचा वैज्ञानिकदृष्ट्या कोणताही ठोस पुरावा नाही. गोमय किंवा गोमुत्र यांमुळे कोरोनाविरोधातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते, याचे प्रमाण आढळलेले नाही. असे केल्याने एखाद्या आजारचा प्राण्यांमधून माणसांमध्ये संसर्ग होऊ शकतो, असे डॉ. जयलाल यांनी म्हटले आहे.