कोरोना लसीमुळे खरेच हार्ट अटॅक येतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:50 AM2023-11-22T05:50:13+5:302023-11-22T05:51:02+5:30
सरकार म्हणते, लसीमुळे एकही मृत्यू नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरात युवकांच्या आकस्मिक मृत्यूंसाठी कोरोना लस कारणीभूत नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे. कोरोनाची झालेली बाधा, कुटुंबात आकस्मिक मृत्यू होण्याचा असलेला वैद्यकीय इतिहास तसेच बदललेली जीवनशैली या गोष्टींमुळे युवकांमध्ये आकस्मिक मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत.
आकस्मिक मृत्यू होण्यामागे कोरोना लस हे कारण नसल्याचे या संस्थेने म्हटले आहे. अलीकडे हार्ट अटॅकने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
निष्कर्ष काय?
n१८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या आकस्मिक मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. त्यासंदर्भात आयसीएमआरने अभ्यास केला. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला.
nनिरोगी युवकांचे आकस्मिक मृत्यू होण्याच्या घटना या लसीमुळे होत असाव्यात, अशी शंका व्यक्त होत होती. त्यामुळे या विषयाचा आयसीएमआरने
अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता.
या संस्थेने सुमारे ३ हजार प्रकरणांचा अभ्यास केला. या व्यक्ती १८ ते ४५ वर्षे वयोगटातील होत्या. तसेच त्यांना एकाहून अधिक व्याधी नव्हत्या. मात्र १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत त्या व्यक्तींच्या मृत्यूंच्या घटना घडल्या.
कोरोनाने लोक मरत असतील; तर मरू द्या : ऋषी सुनक
२०२०मध्ये कोरोना साथीच्या दरम्यान दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्याच्या विरोधात ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान (व तत्कालीन अर्थमंत्री) ऋषी सुनक यांनी विरोध केला होता. कोरोना साथीमध्ये माणसे मरत असतील तर मरू देत, अशी भूमिका सुनक यांनी घेतली होती, असा दावा कोरोनाबाबत नेमलेल्या एका समितीने केला.
कोरोनाची स्थिती कशी हाताळली, याचा अभ्यास ही समिती करत आहे. २०२० मध्ये सुनक यांनी एका बैठकीत जी वक्तव्ये केली ती त्यावेळचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पॅट्रिक वॉलेस यांनी डायरीमध्ये टिपूून घेतली होती. त्याच्याच आधारे आता समितीने हा दावा केला आहे.