Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभाव कमी होतोय? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 08:47 AM2021-06-29T08:47:22+5:302021-06-29T08:49:51+5:30
Delta Plus Variant: देशातील कोविड साथीच्या दुसर्या लाटेमध्ये संक्रमित लोकांची संख्या दररोज चार लाखांच्यावर पोहोचली होती, जी गेल्या काही दिवसांत घटून ५०००० च्या आसपास गेली आहे
मुंबई – देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण(Coronavirus) कमी होत असतानाच डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेन्शन वाढवलं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या पद्धतीनं कोरोना त्याचं रुप बदलत आहे त्यामुळे महामारीच्या कोणत्या लाटेची निश्चित तारीख सांगता येत नाही असं कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के पॉल यांनी सांगितले.
व्ही. के पॉल म्हणाले की, सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे(Delta Plus Variant) लसीचा प्रभाव कमी होत असल्याचा कोणताही आकडा आमच्याकडे नाही. नियमांचे पालन आणि कोविड महामारीपासून वाचण्यासाठी प्रभावी पाऊल देशाला कोणत्याही मोठ्या संकटातून वाचण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत वैज्ञानिक आधार नाही ज्याने हा व्हायरस वेगाने संसर्ग पसरवत आहे हे सिद्ध होईल किंवा कोविड लसीचा प्रभाव कमी करत आहे. महामारीची नवी लाट अनेक गोष्टींवर निर्भर असते.
सध्याच्या महामारीत कोरोना संसर्गापासून बचाव करण्याची योग्य पद्धत ही नियमांचे कटोर पालन आणि लसीकरण धोरणांच्या दृष्टीकोनात व्यापक अनुशासनांवर अवलंबून असेल. याव्यतिरिक्त, विषाणूमध्ये होणारे बदल कोरोना आजाराची गतिशीलता बदलू शकते. महामारीची आणखी एक लाट येईल की नाही, हे आमच्या नियंत्रणाखाली नाही. माझ्या मते, लाटेसाठी कोणतीही तारीख दिली जाऊ शकत नाही. देशातील कोविड साथीच्या दुसर्या लाटेमध्ये संक्रमित लोकांची संख्या दररोज चार लाखांच्यावर पोहोचली होती, जी गेल्या काही दिवसांत घटून ५०००० च्या आसपास गेली आहे. देशातील अनेक राज्यांतही निर्बंध शिथिल केले जात आहेत. असंही व्ही. के पॉल यांनी सांगितले.
जर आपण दृढ संकल्प आणि नियमांचे पालन केल्यास महामारीचा सामना करण्यासाठी आपल्याला मदत होईल. सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. त्यात या व्हेरिएंटमधील बदल, व्हेरिएंटमुळे संक्रमण वेगाने पसरेल की संक्रमित रुग्णांची गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत लसीचा प्रभाव कितपत आहे. याबद्दल सध्या काही सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे वैज्ञानिकांच्या अहवालाची आणि सूचनांची वाट पाहावी लागेल असंही ते म्हणाले. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा शोध ११ जूनला लागला.