कुणी पाणी देता का पाणी मुख्यभवनात पालिकेचे कर्मचारीच तहानेलेले

By admin | Published: May 8, 2015 10:46 PM2015-05-08T22:46:05+5:302015-05-08T22:46:05+5:30

पुणे : शहराची तहान भागविणा-या महापालिकेच्या मुख्यभवनात पाण्यावीना तहानलेले आहेत. मुख्यभवनाच्या इमारतीस पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी फुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून या इमारतील कर्मचा-यांना पिण्यासाठीच पाणीच नाहीये,त्यामुळे या कर्मचा-यांना पाण्यासाठी परिसरातील खासगी हॉटेलचा सहारा घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागही या बाबीपासून अनभिज्ञच आहे.

Does the water give water to the Chief Minister and the police personnel are thirsty? | कुणी पाणी देता का पाणी मुख्यभवनात पालिकेचे कर्मचारीच तहानेलेले

कुणी पाणी देता का पाणी मुख्यभवनात पालिकेचे कर्मचारीच तहानेलेले

Next
णे : शहराची तहान भागविणा-या महापालिकेच्या मुख्यभवनात पाण्यावीना तहानलेले आहेत. मुख्यभवनाच्या इमारतीस पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी फुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून या इमारतील कर्मचा-यांना पिण्यासाठीच पाणीच नाहीये,त्यामुळे या कर्मचा-यांना पाण्यासाठी परिसरातील खासगी हॉटेलचा सहारा घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागही या बाबीपासून अनभिज्ञच आहे.
महापालिकेच्या मुख्यभवानाच्या मागील बाजूच्या विस्तारीत इमारतीचे काम मागील महिन्यात सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी खोदकाम सुरू आहे. हे काम सुरू असताना,बुधवारी मुख्यभवनास पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी फुटली आहे. त्यामुळे इमारतीस गुरूवारी संपूर्ण दिवसभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठाच झाला नाही. तर गुरूवारी सांयकाळी ही वाहीनी दुरूस्त केल्यानंतर पुन्हा फुटली त्यामुळे शुक्रवारी दिवसभरही इमारतीत पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही नव्हता. प्रत्यक्षात या इमारतील दोन हजारहून अधिक कर्मचा-यांसह शेकडो नागरीक दररोज येत असतात, त्यातच उन्हाळयाचे दिवस असल्याने बाहेरून आलेल्या नागरिकांना या पाण्याचा सहारा मिळतो. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाणीच नसल्याने या ठिकाणी पाणी नसल्याचे फलक महापालिका प्रशासनाकडून लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणा-या महापालिकेस आपल्या कर्मचा-यांना पाणी देता येत नसेल तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
==============================
फोटो आहे
राऊत लॉगईन मध्ये 8 पाणी या नावाने

Web Title: Does the water give water to the Chief Minister and the police personnel are thirsty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.