'गॅस काय तुझा बाप देतो का?', तरुणींवर का भडकला रिक्षाचालक?; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:52 PM2024-09-05T16:52:01+5:302024-09-05T16:56:19+5:30
Bengaluru viral video : बंगळुरूमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका रिक्षाचालकाने तरुणीच्या कानशिलात लगावताना आणि मोबाईल पडल्याचे यात दिसत आहे.
Bengaluru video : बंगळुरू शहरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ बघून लोक संताप व्यक्त करत आहेत. एक रिक्षाचालक तरुणीला कानाखाली मारतो. तसेच तिला पोलीस ठाण्यात चल म्हणून उद्धटपणे वागताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर महिला सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. (Girl harassed by auto driver over ride cancellation in bengaluru, video goes viral)
हा व्हिडीओ बंगळुरूतील असून, रिक्षामध्ये दोन तरुणी बसल्या होत्या. मात्र, त्यांनी अचानक जायचे रद्द केले. त्यावरून हा वाद सुरू झाला होता. तरुणींनी राईड कॅन्सल केल्याने एक रिक्षाचालक येऊ त्यांच्याशी हुज्जत घालू लागला.
तुझा बाप गॅस देतो का?
दुसऱ्या रिक्षाचा चालक येऊन तरुणीसोबत वाद घालत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिक्षाचालक मोठमोठ्याने बोलत आहे. तरुणी त्याला म्हणतात की, 'तुम्ही इतके ओरडून का बोलत आहात?' त्यावर रिक्षा चालक म्हणतो की, 'गॅस काय तुझा बाप देतो का?'
एक तरुणी त्या रिक्षाचालकाला म्हणते की, अशी गैरवर्तणूक केली तर आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार देऊ. त्यानंतर रिक्षाचालक आणखी आवाज वाढवून बोलू लागला. त्या तरुणींना म्हणाला की, चला, पोलीस ठाण्यात.
उलट सवाल करताच तरुणीच्या मारली कानशिलात
तरुणी त्याला म्हणत आहे की, राईड कॅन्सल केली, तर अशी कोणती चूक केली. तुम्ही पण राईड कॅन्सल करता ना? त्यानंतर रिक्षाचालक त्या तरुणीला कानाखाली मारतो. त्याला लोक समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तो तरुणींवर ओरडून बोलताना दिसत आहे.
#बैंगलोर-राइड कैंसल करने पर भड़क गया ऑटो ड्राइवर..लड़की को थप्पड़ मारने का वीडियो वायरल..#viralvedio#banglurupic.twitter.com/MitAkX1aF2
— Vinit Tyagi(Journalist) (@tyagivinit7) September 5, 2024
व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर लोक संताप व्यक्त करत असून, त्या रिक्षाचालकावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.