आईसमोर चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला; पोट फाडले, डॉक्टरही वाचवू शकले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 08:48 PM2022-10-18T20:48:24+5:302022-10-18T20:49:07+5:30

3 कुत्र्यांनी घेरुन मुलावर हल्ला केला, आई येईपर्यंत शरीराचे लचके तोडले

Dog attack on infant in Noidas Lotusword Society, boy died | आईसमोर चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला; पोट फाडले, डॉक्टरही वाचवू शकले नाही

आईसमोर चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला; पोट फाडले, डॉक्टरही वाचवू शकले नाही

googlenewsNext

नोएडा: नोएडाच्या लोटस बुलेवर्ड सोसायटीत सोमवारी सायंकाळी एक वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात कुत्र्यांनी मुलाचे पोट फाडले, त्यामुळे त्याचे आतडे बाहेर आले. कसेबसे कुत्र्यांपासून बाळाला वाचवल्यानंतर सोसायटीतील लोकांनी त्याला नोएडा येथील रिअॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, शस्त्रक्रिया करूनही मुलाला वाचवता आले नाही.

3 कुत्र्यांचा घेरून हल्ला 
सोसायटीतील धरमवीर यादव यांनी सांगितले की, राजेश आणि त्याची पत्नी सपना सेक्टर-110 मध्ये राहतात. या जोडप्याला एक वर्षाचे मूल(अरविंद) होते. सोमवारी सपना मुलासोबत लॉट्स बुलेवर्ड सोसायटीच्या गार्डनमध्ये आली. यावेळी टॉवर 30 जवळ 3 कुत्र्यांनी मुलाला घेरले. मुलाला कुत्रा चावला तेव्हा सपना तिथेच होती. मुलाची ओरड ऐकून ती त्याच्याकडे धावली. तोपर्यंत अनेक ठिकाणाहून कुत्र्यांनी मुलाच्या शरीराला चावा घेतला होता. त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. कसेबसे मुलाची सुटका झाली. मग त्याला दवाखान्यात नेले.

कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना सोसायटीत सोडले
काही दिवसांपूर्वी महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी केल्याचे सोसायटीतील लोकांनी सांगितले. यानंतर त्याला पुन्हा येथे आणून सोडण्यात आले होते. सोसायटीचे रहिवासी विनोद शर्मा यांनी सांगितले की, तीन वर्षांपासून या कुत्र्यांचा त्रास आहे. कुत्रा चावण्याच्या घटना दर दोन महिन्यांनी होतात. लोक येतात आणि कुत्र्यांना खायला घालतात. आता ते मनुष्यभक्षक झाले आहेत. 

गेल्या काही महिन्यात अशा घटनांमध्ये वाढ

  • लखनौमध्ये कुत्र्याने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावाघेतला होता. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तो तरुण 2 दिवस अॅडमिट होता.
  • गाझियाबादमध्येही बागेत खेळणाऱ्या मुलावर पिटबुलने हल्ला केला होता. मुलाच्या चेहऱ्यावर 150 टाके लागले.
  • गाझियाबादमध्येच लिफ्टमध्ये कुत्र्याने एका मुलावर हल्ला केला होता. त्या कुत्र्याची मालकिन तिथेच उभी होती.
  • नोएडामध्येही लिफ्टमध्ये कुत्र्याने डिलीव्हरी बॉयच्या प्रायवेट पार्टवर चावा घेतला.
  • 13 जुलै रोजी लखनौमध्ये पिटबुलच्या हल्ल्यात 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, ती महिलाच त्या कुत्र्याची मालकीन होती.
     

Web Title: Dog attack on infant in Noidas Lotusword Society, boy died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.