मोमोजमध्ये आढळलं कुत्र्याचं मांस; दिल्लीतील दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 10:16 AM2017-07-22T10:16:40+5:302017-07-22T10:16:40+5:30
तुम्हाला जर चिकन मोमोज खायला आवडत असतील तर आता तुन्हाला जरा सावध रहायला हवं.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22- तुम्हाला जर चिकन मोमोज खायला आवडत असतील तर आता तुन्हाला जरा सावध रहायला हवं. चिकन मोमोजमध्ये कुत्र्याचं मांस असल्याचा तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. दिल्लीत चिकन मोमोजमध्ये कुत्र्याचे मांस आढळलं आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात दिल्लीतील २० दुकानं बंद करण्यात आली असून कँट परिसरातील आर्मी कँटीनमध्ये मोमोज विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
दिल्लीच्या कँट बोर्डाला मोमोजमध्ये कुत्र्याचं मांस टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. विशेष करून कँट परिसरातील ७० वेंडिंग झोन आणि काही महत्त्वाच्या दुकानात मोमोजमधील चिकनमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मोमोजचा दर्जा तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. दर्जा चांगला नसेल तर दुकानदाराचं सामान जप्त करून दुकानाला सिल ठोकण्याचे आदेश दिले होते, असं कॅ़ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेड्डी शंकर बाबू यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
...अन् राणीबागेतील ‘बर्थ डे बॉय’ने मारला केकवर ताव
‘ट्रेनमध्ये सीट देण्यासाठी लाच मागणे म्हणजे खंडणी नाही’
नेसलेल्या वस्त्रानिशी पालिकेने केले बेघर!
कँट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेड्डी शंकर बाबू यांच्या आदेशानंतर गोपीनाथ बाजार, सदर बाजार आणि वेंडिंग झोनमधील शेकडो दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्यांना काही गोष्टींचा संशय आला. त्यात काही दुकानातील मोमोजमध्ये चिकनऐवजी कुत्र्याचं मांस आढळून आलं. तर काही दुकानात मांसचा दर्जा व्यवस्थित नसल्याचं आढळून आल्यानं एकूण २० दुकानांमधील सामान जप्त करून ती दुकानं बंद करण्यात आली.
रेड्डी शंकर बाबू यांच्या आदेशानुसार एनफोर्समेंट विंगने एक टास्क फोर्स बनवली आहे. दिल्लीतील कँट बोर्ड भागात फक्त मोमोजची नाही तर इतरही हानिकारक खाद्याची विक्री होऊ देणार नाही. ज्या दुकानात खराब अन्न विकलं जात असल्याचा संशय आम्हाला येइल, त्या दुकानाची तपासणी केली जाइल. जर तेथिल अन्नाचा दर्जा खराब असल्याचं निदर्शनास आलं तर ते दुकान लगेच बंद केलं जाईल. तसंच दुकानदारांना दुकानाच्या आजूबाजूच्या भागात स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, जर तसं दिसलं नाही तरीही कारवाई केली जाणार असल्याचं टास्क फोर्सचे प्रमुख महेश जायसवाल यांनी सांगितलं आहे.