एम्स हॉस्पिटलमध्ये भटकी कुत्री, माकडांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:34 IST2018-04-26T00:34:00+5:302018-04-26T00:34:00+5:30
उघड्यावर टाकलेले खाद्यपदार्थ भटकी कुत्री व माकडांना उपलब्ध होतात.

एम्स हॉस्पिटलमध्ये भटकी कुत्री, माकडांचा उच्छाद
नवी दिल्ली : अतिशय नामांकित अशा आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या परिसरात भटकी कुत्री व माकडांनी उच्छाद मांडला आहे. लोकांच्या अंगावर धावून जाण्याचे, हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे डॉक्टर, रुग्ण व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला
आहे.
एम्समधील निवासी डॉक्टरांच्या संस्थेने केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री मनेका गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्याला दिलेल्या उत्तरात गांधी यांनी म्हटले की, तेथील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल.
खाद्यपदार्थ टाकू नका
तिथे उघड्यावर टाकलेले खाद्यपदार्थ भटकी कुत्री व माकडांना उपलब्ध होतात. लोकांना जेवण्यास जागा ठरवून दिल्या पाहिजेत. उरलेले खाद्यपदार्थ बंद कचरापेटीतच टाकले पाहिजेत. हे काटेकोरपणे पाळले गेल्यास सारे प्राणी दुसरीकडे जातील, असेही मनेका गांधी यांनी म्हटले आहे.