कुत्र्यांना दिले पोलिसांना चावण्याचे प्रशिक्षण; घरात सापडली १३ कुत्री, १७ किलो गांजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 09:14 AM2023-10-01T09:14:57+5:302023-10-01T09:19:37+5:30

या कुत्र्यांवर पोलिसांनी नियंत्रण मिळवेपर्यंत त्या घरातील सर्व लोक पळून गेले होते.

Dogs trained to bite police; 13 dogs, 17 kg of ganja were found in the house | कुत्र्यांना दिले पोलिसांना चावण्याचे प्रशिक्षण; घरात सापडली १३ कुत्री, १७ किलो गांजा

कुत्र्यांना दिले पोलिसांना चावण्याचे प्रशिक्षण; घरात सापडली १३ कुत्री, १७ किलो गांजा

googlenewsNext

कोट्टायम : पोलिसांसह खाकी गणवेश घातलेल्या कोणत्याही व्यक्तीस चावण्याचे कुत्र्यांना प्रशिक्षण देणाऱ्या रॉबिन याला पोलिसांनी अटक केली आहे. तो अमली पदार्थांची तस्करी करतो. केरळमधील कोट्टायम येथील एका घरावर पोलिसांनी छापा मारला असता तेथील कुत्रे त्यांच्या अंगावर धावून गेले. या कुत्र्यांवर पोलिसांनी नियंत्रण मिळवेपर्यंत त्या घरातील सर्व लोक पळून गेले होते.

पोलिसांनी छापा मारला त्यावेळी घरात १३ कुत्रे होते. त्यामध्ये पिटबूल, रॉटवीलर प्रजातीची कुत्री अधिक संख्येने होती. पोलिसांच्या अंगावर धावून गेलेल्या कुत्र्यांवर काही वेळाने नियंत्रण मिळविण्यात आले. रॉबिनच्या घरातून १७ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्या घरात हिंसक प्रवृत्तीची इतकी कुत्री असतील, याची पोलिसांना सुतराम कल्पना नव्हती.

Web Title: Dogs trained to bite police; 13 dogs, 17 kg of ganja were found in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.