डोंबिवलीत  श्री गणेश मंदिर संस्थानचा उपक्रम : देश माझा मी देशाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:46 PM2018-01-23T18:46:54+5:302018-01-23T18:51:48+5:30

धार्मिक अधिष्ठानासह राष्ट्रीयत्वाच्या जागरणाचा संकल्प करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी एकत्र यावे असे आवाहन श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी पहिल्यांदाच संस्थानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. देश माझा मी देशाचा या संकल्पनेनूसार हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे.

Dombivlit Sri Ganesh Temple: The country is my country | डोंबिवलीत  श्री गणेश मंदिर संस्थानचा उपक्रम : देश माझा मी देशाचा

डोंबिवलीत  श्री गणेश मंदिर संस्थानचा उपक्रम : देश माझा मी देशाचा

Next
ठळक मुद्देभाजपाचा तिरंगा एकता  पाठिंबा देण्यासाठी मिस्डकॉल द्या आवाहन

डोंबिवली: धार्मिक अधिष्ठानासह राष्ट्रीयत्वाच्या जागरणाचा संकल्प करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी एकत्र यावे असे आवाहन श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी पहिल्यांदाच संस्थानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. देश माझा मी देशाचा या संकल्पनेनूसार हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे.
नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी देशासाठी काही क्षण एकत्र यावे असे आवाहन संस्थानाने केले असून त्याच निमित्ताने भारतमाता पूजन व सामुहिक झेंडावंदन करण्यात येणार आहे. असे उपक्रम ठिकठिकाणी व्हावेत असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले. शाळांमध्ये या निमित्ताने निवडक विद्यार्थ्यांना बोलावण्यात येते, अनेक सरकारी, नीम सरकारी कर्मचारी हे झेंडावंदनाला जाण्याची इच्छा असूनही जाऊ शकत नाहीत, अशा अबालवृद्धांनी सगळयांनी एकत्र यावे, या संकल्पात सहभागी व्हावे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले. सकाळी ८.३० वाजता गणेश मंदिर संस्थानाच्या प्रांगणात हा उपक्रम संपन्न होणार असून त्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक हे उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
तर भाजपाच्या वतीनेही तिरंगा एकता असे सोशल मिडियावर देण्यात आले आहेत. त्यासाठी पाठींबा देण्यासाठी ७८७८७८५०५० या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
===============

Web Title: Dombivlit Sri Ganesh Temple: The country is my country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.