देशांतर्गत विमान वाहतूक रनवेवर! प्रवासीसंख्येने गाठली कोरोनापूर्व पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 07:29 AM2021-10-20T07:29:13+5:302021-10-20T07:29:27+5:30

कोविडचा विळखा शिथिल झाल्यानंतर विमानांना १०० टक्के क्षमतेने उड्डाण करण्याची परवानगी सरकारने अलीकडेच दिली आहे. सणासुदीच्या काळात लोकांची प्रवासाची गरज वाढत आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

Domestic air traffic count on Sunday neared pre COVID levels | देशांतर्गत विमान वाहतूक रनवेवर! प्रवासीसंख्येने गाठली कोरोनापूर्व पातळी

देशांतर्गत विमान वाहतूक रनवेवर! प्रवासीसंख्येने गाठली कोरोनापूर्व पातळी

Next

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात प्रवासात मोठी वाढ झाल्याने देशांतर्गत हवाई वाहतूक कोविडपूर्व पातळीजवळ पोहोचली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयानुसार, रविवारी ३,२७,९२३ प्रवाशांनी हवाई प्रवास केला, तसेच २,३७२ विमान उड्डाणे झाली.

कोविडचा विळखा शिथिल झाल्यानंतर विमानांना १०० टक्के क्षमतेने उड्डाण करण्याची परवानगी सरकारने अलीकडेच दिली आहे. सणासुदीच्या काळात लोकांची प्रवासाची गरज वाढत आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. रविवारच्या आधीची सर्वोच्च हवाई प्रवास आकडेवारी फेब्रुवारीमध्ये होती. त्यानंतर देशात दुसरी लाट सुरू झाली. ‘नेटवर्क थॉट्स’चे हवाई वाहतूक विश्लेषक अमेय जोशी म्हणाले की, रविवारी सर्वाधिक कमी ८४.३ टक्के प्रवासी संख्या एअरएशिया इंडियाची राहिली. स्पाईसजेटची प्रवासी संख्या ९० टक्क्यांवर गेली आहे. हे क्षेत्र सामान्य होण्याच्या दिशेने घोडदौड करीत असल्याचे संकेत प्रवासी संख्येतील वाढीतून मिळत आहेत.

सरकारच्या विधायक धोरणांमुळे देशांतर्गत हवाई वाहतूक साथ काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. भारतीय नागरी उड्डयन क्षेत्र अभूतपूर्व आव्हानांचा सामना करीत भरभराट करीत आहे. हे क्षेत्र लवकर सामान्य स्थितीत यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- ज्योतिरादित्य सिंदिया, 
नागरी विमान वाहतूकमंत्री

विमान प्रवाशांची संख्या
१७ ऑक्टोबर : ३,२७,९२३
२८ फेब्रुवारी : ३,१४,०००

यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असून, या काळातील हवाई प्रवासाचे बुकिंग गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत ४५० टक्के अधिक आहे.
 

Web Title: Domestic air traffic count on Sunday neared pre COVID levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.