देशांतर्गत विमानप्रवास झाला स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:39 PM2024-10-14T12:39:36+5:302024-10-14T12:40:10+5:30
प्रवासी कंपनी ‘इक्सिगो’ने केलेल्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त गावी किंवा अन्य राज्यात फिरायला जाण्याचा बेत आखणाऱ्यासांठी चांगली बातमी आहे. अनेक देशांतर्गत मार्गांवर विमान प्रवासाचे सरासरी दर मागील वर्षीच्या तुलनेत वार्षिक आधारे २० ते २५ टक्के कमी झाले आहेत. प्रवासी कंपनी ‘इक्सिगो’ने केलेल्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.
‘इक्सिगो’चे सीईओ अलोक वाजपेयी म्हणाले की, मागच्या वर्षी दिवाळीदरम्यान मर्यादित क्षमतेमुळे तिकिटांचे दर वाढले होते. गो-फर्स्टवरील निलंबनाच्या कारवाईमुळे हा ताण निर्माण झाला होता. यंदा मात्र क्षमतेत अतिरिक्त भर पडली आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावर दर वार्षिक आधारे २० ते २५ टक्के घटले आहेत.
कोणत्या मार्गावर किती घट?
मार्ग २०२४ २०२३ प्रमाण (टक्के)
बंगळुरु-कोलकाता ६,३१९ १०,१९५ ३८%
चेन्नई-कोलकाता ५,६०४ ८,७२५ ३६%
मुंबई-दिल्ली ५,७६२ ८,७८८ ३४%
दिल्ली-उदयपूर ७,४६९ ११,२९६ ३४%