देशांतर्गत विमान प्रवासासाठी आधार किंवा पासपोर्ट हवा?
By Admin | Published: April 10, 2017 01:03 AM2017-04-10T01:03:32+5:302017-04-10T01:03:32+5:30
देशांतर्गत प्रवासासाठी सरकार लवकरच आधार कार्ड किंवा पासपोर्ट आवश्यक करील. विमानातून प्रवास करण्यास
नवी दिल्ली : देशांतर्गत प्रवासासाठी सरकार लवकरच आधार कार्ड किंवा पासपोर्ट आवश्यक करील. विमानातून प्रवास करण्यास बंदी असलेल्या प्रवाशांची सरकार यादी बनवणार असून त्याच धर्तीवर प्रवाशांची पूर्ण ओळख पटण्यासाठी आधार किंवा पासपोर्ट बंधनकारक करण्याचा विचार आहे.
शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्याकडून नुकतीच एअर इंडियाच्या विमानात एअर इंडियाच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकार सुरक्षित प्रवास आणि दांडगाई करणाऱ्या प्रवाशांना विमानात प्रवेश रोखण्यासाठी उपाय करीत आहे. विमान प्रवासाचे जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्यानुसारच प्रवाशाच्या ओळखीची प्रक्रिया असेल. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तिकीट बुक करताना प्रवाशाला पासपोर्ट किंवा आधारकार्डचा तपशील द्यावा लागतो.