स्वयंपाकाचा गॅस १५ दिवसांत महागला; ५० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 03:58 AM2020-12-16T03:58:11+5:302020-12-16T06:59:13+5:30

शंभर रुपयांनी हलका होणार खिसा

Domestic cooking gas prices raised | स्वयंपाकाचा गॅस १५ दिवसांत महागला; ५० रुपयांची वाढ

स्वयंपाकाचा गॅस १५ दिवसांत महागला; ५० रुपयांची वाढ

googlenewsNext

नवी दिल्ली : घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोचे सिलिंडर ५० रुपयांनी, ५ किलोचे शॉर्ट-सिलिंडर १८ रुपयांनी आणि १९ किलोचे सिलिंडर ३६.५० रुपयांनी महागले आहे. मागील १५ दिवसांत सिलिंडरच्या दरात दोन वेळा १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत १४.२ किलोचे विनासबसिडीचे सिलिंडर आता ६४४ रुपये झाले आहे, तसेच कोलकात्यात त्याची किंमत ६७०.५० रुपये, मुंबईत ६४४ रुपये आणि चेन्नईत ६६० रुपये झाली आहे. 

एलपीजी सिलिंडरचे दर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या निर्धारित करतात. त्यांच्या दरांचा दरमहा आढावा घेतला जातो. दरवाढीच्या आधी दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरची किंमत दिल्लीत ५९४ रुपये, कोलकात्यात ६२०.५० रुपये, मुंबईत ५९४ रुपये आणि चेन्नईत ६१० रुपये होती. राजधानी दिल्लीत १९ किलो सिलिंडरची किंमत ५४.५० रुपयांनी वाढली आहे. 

मेपासून सबसिडी नाहीच
सबसिडीचे वर्षाला १२ गॅस सिलिंडर एका कुटुंबाला मिळतात. खरेदीच्या वेळी ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण किंमत अदा करावी लागते. नंतर सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यावर जमा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कोसळल्यामुळे उत्पादन खर्च आणि बाजारातील किंमत एकाच पातळीवर आली आहे. त्यामुळे मेपासून ग्राहकांना सबसिडी मिळालेली नाही.

Web Title: Domestic cooking gas prices raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.