देशांतर्गत विमानप्रवास १६ टक्क्यांनी महागणार; केंद्र सरकारकडून किमान प्रवासभाड्याची मर्यादेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 06:22 AM2021-05-30T06:22:32+5:302021-05-30T07:21:52+5:30

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. किमान प्रवासभाडे वाढविण्यात आले असले, तरीही कमाल प्रवासभाड्याची मर्यादा बदलण्यात आलेली नाही.

Domestic flights will become 16 per cent more expensive | देशांतर्गत विमानप्रवास १६ टक्क्यांनी महागणार; केंद्र सरकारकडून किमान प्रवासभाड्याची मर्यादेत वाढ

देशांतर्गत विमानप्रवास १६ टक्क्यांनी महागणार; केंद्र सरकारकडून किमान प्रवासभाड्याची मर्यादेत वाढ

Next

नवी दिल्ली/मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या भडकलेल्या क‍िमतींमुळे सर्वसामान्यांवर रडण्याची वेळ आली आहे. त्यातच आता देशांतर्गत विमानप्रवासही महागणार आहे. केंद्र सरकारने किमान प्रवासभाड्याची मर्यादा १६ टक्के वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे किमान भाडे १३ ते १६ टक्क्यांनी वाढणार आहे. 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. किमान प्रवासभाडे वाढविण्यात आले असले, तरीही कमाल प्रवासभाड्याची मर्यादा बदलण्यात आलेली नाही. प्रवासभाड्याच्या सीमा गेल्या वर्षी २५ मेपासून विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यानंतर निर्धारित करण्यात आली होती. नवे बदल १ जूनपासून अंमलात येतील. त्यानुसार, ४० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान प्रवासभाडे २,३०० रुपयांऐवजी २,६०० रुपये निर्धरित करण्यात आले आहे, तर ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी ३,३०० रुपये किमान प्रवासभाडे आकारण्यात येतील. 

दुसऱ्या लाटेमुळे घेतला निर्णय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रवासी संख्या घटली आहे. सरकारने १ जूनपासून प्रवासी क्षमता सध्याच्या ८० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणली आहे. सरकारच्या निर्देशांनुसार उड्डाणांची संख्याही घटविण्यात येणार आहे. त्यामुळे १ जूननंतर तिकिटे रद्द होण्याची शक्यता आहे. विमान कंपनी प्रवाशांना पर्यायी विमानात जागा उपलब्ध करून देण्यात येईल किंवा प्रवासभाडे परत करण्यात येईल, तसेच प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलण्याची एक मोफत संधी देण्यात येईल.

नवीन दरपत्रक (किमान भाडे)
४० मिनिटांपर्यंत - २६०० रुपये
४० ते ६० मिनिटे - ३३०० रुपये
६० ते ९० मिनिटे - ४००० रुपये
९० ते १२० मिनिटे - ४७०० रुपये
१२० ते १५० मिनिटे - ६१०० रुपये
१५० ते १८० मिनिटे - ७४०० रुपये
१८० ते २१० मिनिटे - ८७०० रुपये

नुकसान झेलणाऱ्या कंपन्यांना दिलासा 
प्रवासभाडे वाढविण्यात आल्यामुळे कोरोना महामारीच्या काळात आर्थ‍िक नुकसान सहन करणाऱ्या विमान कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना संसर्गाच्या देशात आलेल्ल्या सऱ्या लाटेमुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.

Web Title: Domestic flights will become 16 per cent more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.