घरगुती गॅस सिलिंडर्सच्या गळतीमुळे वाढताहेत मृत्यू

By Admin | Published: May 6, 2017 04:56 PM2017-05-06T16:56:27+5:302017-05-06T17:29:11+5:30

झालीच गॅसगळती, तर काय कराल? आपल्या उपकरणांची कशी घ्याल काळजी? वाचायलाच हवं.

Domestic gas cylinders grow due to leakage | घरगुती गॅस सिलिंडर्सच्या गळतीमुळे वाढताहेत मृत्यू

घरगुती गॅस सिलिंडर्सच्या गळतीमुळे वाढताहेत मृत्यू

googlenewsNext

 - मयूर पठाडे

 
घरगुती गॅसगळतीमुळे विशेषत: सिलिंडरच्या गळतीमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या आपल्याकडे खूपच अधिक आहे. अगदी खेड्यापाड्यातही आज स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर्स वापरले जातात, पण त्यासंदर्भात म्हणावी तितकी काळजी घेतली जात नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या अभ्यासानुसार गॅस सिलिंडर्समुळे होणार्‍या मृत्यूंचं प्रमाण दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 
 
1- घरात गॅसचा वास येतो आहे अशी शक्यता जरी वाटली, तरी लगेच अगोदर दारं खिडक्या उघडून हा वास बाहेर जाऊ द्या.
2- तोपर्यंत, अगदी रात्र असली तरीही ट्यूब किंवा लाईटचे बटनही सुरू करू नका. त्यातून निघणारी ठिणगीही आग लागायला कारणीभूत ठरू शकते. 
3- गॅसचा वास येत असल्यास काडेपेटी, गॅस लायटर, सिगारेट लायटर किंवा तत्सम कोणत्याही गोष्टी वापरू नका.
4- घरात दुसर्‍या खोलीत कुठे मेणबत्ती वगैरे सुरू असेल तरी ती लगेच विझवा.
5- सिलिंडरच्या रेग्युलेटरचा स्विच तातडीनं बंद करा. 
6- शक्य असेल तर रेग्युलेटर काढून सिलिंडरही घराबाहेर उघड्यावर नेऊन ठेवा.
7- कंपनीच्या माणसाला तातडीनं फोन करुन बोलवा.
8- त्यासंदर्भातले फोन नंबर्स आपल्या हाताशी आणि घरातील सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठळक अक्षरात लिहून ठेवा.
9- काही शंका असेल तर नॅशनल गॅस सर्व्हिस इर्मजन्सीला फोन करा. 0800 111 999 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते. 
10- काही तातडीच्या गोष्टींसाठी ते फोनवरही आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. 

 

Web Title: Domestic gas cylinders grow due to leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.