घरगुती गॅस महागला, आता वाढू शकते सबसिडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 05:42 AM2023-08-06T05:42:46+5:302023-08-06T05:43:08+5:30

१ जानेवारी २०२० रोजी घरगुती एलपीजीची किंमत ५९४ रुपये होती. तीन वर्षांत ती १ जुलै २०२३ रोजी ११०३ रुपयांपर्यंत वाढली. 

Domestic LPG gas became expensive, subsidy may increase soon because of Loksabha Election | घरगुती गॅस महागला, आता वाढू शकते सबसिडी 

घरगुती गॅस महागला, आता वाढू शकते सबसिडी 

googlenewsNext

- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तीन वर्षांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती जवळपास दुप्पट झालेल्या असताना ग्राहकांची सबसिडी २०२१-२२ मध्ये १८११ कोटी रुपयांपर्यंत कमी झाली आहे. १ जानेवारी २०२० रोजी घरगुती एलपीजीची किंमत ५९४ रुपये होती. तीन वर्षांत ती १ जुलै २०२३ रोजी ११०३ रुपयांपर्यंत वाढली. 

२०१२-१३मध्ये यूपीएच्या कालावधीत ४१,५६५ कोटी रुपयांचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर एलपीजीवरील सबसिडी २०१४मध्ये एनडीएच्या कालावधीत ३,९७१ कोटी रुपये होती. निवडणुका जवळ आल्यावर २०१८-१९मध्ये एलपीजी सबसिडीचे बिल पुन्हा ३७,२०९ कोटी रुपयांपर्यंत वाढले. त्याच्या पुढच्या वर्षी २४,१७२ कोटी रुपयांपर्यंत घसरले व २०२०-२१मध्ये ते ११,८९६ कोटी रुपयांपर्यंत खाली आले. 

२०२२-२३मध्ये निवडणुका जवळ आल्याने अनुदानाचे बिल ६,९६५  कोटी रुपयांनी वाढले आणि अतिरिक्त २२,००० कोटी रुपये तेल विपणन कंपन्यांना एकरकमी भरपाई म्हणून देण्यात आले. निवडणुका जवळ आल्यावर घरगुती एलपीजीसाठीची रक्कम वाढविली जात आहे. 

Web Title: Domestic LPG gas became expensive, subsidy may increase soon because of Loksabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.