भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 09:38 AM2020-02-19T09:38:13+5:302020-02-19T09:42:17+5:30
आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करण्यास इच्छूक आहोत. आम्ही ती करणार आहोत. मात्र अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी ही डील होऊ शकेल याविषयी काहीही सांगता येणार नाही. परंतु, आम्ही भारतासोबत मोठा व्यापारी करार करणार आहोत, याची ट्रम्प यांनी पुनरावृत्ती केली.
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यात ट्रेड डील अर्थात व्यापारी करार होण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत होती. मात्र ट्रम्प यांनी येण्यापूर्वीच भारताशी ट्रेड डील होण्यावर शंका उपस्थित केली आहे.
ट्रम्प म्हणाले की, आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करू इच्छित आहोत. मात्र ही डील अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी होईल की, नंतर याविषयी काहीही सांगता येणार नाही. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला पसंत असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधावर प्रकाश टाकला. भारताने आमच्यासोबत चांगला व्यावहार केला नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र भारत दौऱ्यातून आपल्याला अपेक्षा असल्याचे म्हटले.
अमेरिकेचे राष्ट्रपती 24 फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. या संदर्भात ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करण्यास इच्छूक आहोत. आम्ही ती करणार आहोत. मात्र अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी ही डील होऊ शकेल याविषयी काहीही सांगता येणार नाही. परंतु, आम्ही भारतासोबत मोठा व्यापारी करार करणार आहोत, याची ट्रम्प यांनी पुनरावृत्ती केली.