पंतप्रधान मोदींनी एका तासात तीनवेळा घेतली ट्रम्प यांची गळाभेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 04:43 PM2020-02-24T16:43:31+5:302020-02-24T16:43:57+5:30
मोटेरा स्टेडियमवर दिलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध आता फार पुढे गेले आहे. ट्रम्प यांचा भारत दौरा उभय देशातील मजबूत संबंधांसाठी नवा अध्याय ठरले, असंही मोदी म्हणाले.
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांचे भारतात आगमन झाले. अहमदाबाद विमानतळ येथे आल्यानंतर त्यांनी सबरमती आश्रमाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी 22 किलोमीटरचा रोड शो केला. जगातील सर्वात मोठ्या मोटेरा क्रिकेट स्डेडीयमचे उद्घाटन ट्रम्प यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधीत केले.
ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदींनी देखील मोठ्या उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमाच्या कालावधीत मोदींनी एका तासात ट्रम्प यांची तीन वेळा गळाभेट घेतली. ट्रम्प मोटेरे स्टेडियमवर पोहोचले, त्यावेळी मोदींनी त्यांची पहिल्यांदा गळाभेट घेतली. येथे आयोजित कार्यक्रमात ट्रम्प यांनी भाषण दिल्यानंतर मोदींनी दुसऱ्यांदा त्यांची गळाभेट घेतली. तर तिसऱ्यांदा मोदींनी आपले भाषण पूर्ण केल्यानंतर पुन्हा ट्रम्प यांची गळाभेट घेतली.
या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीअहमदाबाद विमानतळावर ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वागतासाठी गेले होते. त्यावेळी देखील मोदींनी ट्रम्प यांची गळाभेट घेतली होती. अशा प्रकारे एकूण चार वेळा मोदींनी ट्रम्प यांची गळाभेट घेतल्याचे दिसून आले आहे.
मोटेरा स्टेडियमवर दिलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध आता फार पुढे गेले आहे. ट्रम्प यांचा भारत दौरा उभय देशातील मजबूत संबंधांसाठी नवा अध्याय ठरले, असंही मोदी म्हणाले.